पुणे: विद्येचे माहेरघर असलेले पुणे आता गुन्हेगारीचे माहेरघर होऊ लागले आहे की काय असा प्रश्न पुणेकरांना पडू लागला आहे. बाणेर परिसरातील गोळीबाराची घटना ताजी असतानाच पुण्यातील शिवणे परिसरात असलेल्या एका वाईन शॉपवर पाच ते सहा जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. दरोडा टाकतानाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. सर्वात गंभीर म्हणजे दरोडा पडलेली वाईन शॉपी आणि उत्तमनगर पोलिस ठाण्यात केवळ हाकेचे अंतर आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा सवाल निर्माण झाला आहे.

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपचा फायनल सामना पाहण्यात काल पुणेकर दंग असताना पुण्यात कोयता गँगनेने पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण केलं आहे. चक्क दारू फुकट पिण्यासाठी पुण्यातील शिवणे परिसरात मनिष थिएटर जवेळ असलेल्या आर आर वाइन शॉपवर पाच ते सहा जणांनी घुसून धारदार कोयत्याचा धाक दाखवत वाईन शॉप मधील दोन दारूच्या बाटल्या आणि गल्यात असलेली तीन लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

उद्धव ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांना धक्का, पोलीस कोठडीत वाढ
याप्रकरणी आता उत्तमनगर पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज बाळासाहेब (वय 33 रा. कोंढवा धावडे पुणे) यांनी या घडलेल्या प्रकरण बाबत फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,रविवारी रात्री साडे 9 वाजताच्या सुमारास पाच ते सहा जणांनी तलवार आणि पिस्तूलाचा धाका दाखवत वाईन शॉप मध्ये घुसले. वाईन शॉप मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धाक दाखवून गल्ल्यातील अंदाजे तीन लाख रुपयांची रोकड, आणि ब्लेंडर्स प्राईडच्या तीन हजार दोनशे रुपयेच्यांच्या दोन बाटल्या बॅगेत भरून तिथून निघून गेले. सोबत आलेल्या इसमाने हवेत तलवार फिरवत “कोण मध्ये आलं तर त्याला मारून टाकू” अशी धमकी दिली. आणि सगळे दरोडेखोर तिथून पसार झाले. मात्र या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ माजली असून भीतीचं वातावरण पसरलं आहे. याप्रकरणी आता उत्तमनगर पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

Read Latest Maharashtra News And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *