कोपरगावात संविधान दिनाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

कोपरगावात संविधान दिनाचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

रयत शिक्षण संस्थेच्या श्रीसद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज येथे संविधान अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करून २६ जानेवारी १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरू केली. भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाले आहे. या निमित्ताने सांस्कृतिक विभाग व राज्यशास्त्र विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संविधानाचे तत्वज्ञान, मूल्य, आदर्श व संविधान निर्मितीचा उद्देश स्पष्ट करण्याकरिता संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या उद्देशिकेचे वाचन प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले. प्राचार्य डॉ. सरोदे म्हणाले, भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्य याबाबत विद्यार्थी व नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे इन्स्पेक्टर नवनाथ बोडके, काकासाहेब वाळुंज आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. वैशाली सुपेकर यांनी केले. यावेळी डॉ. बाबासाहेब शेंडगे, डॉ. अर्जुन भागवत, डॉ. मोहन सांगळे, प्रा. संजय शिंदे, डॉ. उज्ज्वला भोर, कार्यालयीन अध्यक्ष सुनील गोसावी आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment