कुंभनगरीत चेंगराचेंगरीच्या दाेन घटना; गर्दीची चाेहोबाजूने कोंडी झाल्याने संकट:मौनी अमावास्येला गर्दीत हरवलेल्या आप्तस्वकीयांचा शोधात लाेकांची भटकंती

प्रयागराजच्या कुंभनगरीत मंगळवारी मौनी अमावास्येच्या रात्री एक-दीड वाजेच्या सुमारास संगमतीरावर चेंगराचेंगरी होऊन ३० भाविकांचा मृत्यू झाला. यानंतर ३ तासांनी तेथून दीड किमीवर झुंजी भागात सेक्टर २१ मध्ये चेंगराचेंगरी झाली. पण प्रशासन या घटनेबाबत मौन बाळगून आहे. अजून प्रशासनाने या घटनेची कबुली दिली नाही की काय हानी झाली याची माहिती दिली नाही. दुसरीकडे, गर्दीत अडकलेल्या भाविकांचा दावा आहे की इथेही अनेक लोक जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सेक्टर २१ मध्ये महावीर मार्गावर बुधवारी पहाटे ३.३० पर्यंत सारे ठीक होते. मात्र अचानक पादचारी पूल बंद करण्यात आला. झुंसी संगमावर जे लोक येत होते त्यांना रोखण्यात आले. त्यामुळे २५० मीटर परिसरातच मोठी गर्दी जमा झाली. चारही बाजूंनी ढकलाढकली झाली. झोपलेल्या लोकांना तुडवून लोक रस्ते मिळेल तिकडे जाऊ लागले. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. संतप्त लोकांनी हल्दीराम भुजियावाला यांच्या दुकानाची तोडफोड, लूटमार केली. येथील तरुणीने सांगितले, ‘लोक अचानक दुकानात घुसले. ते पाणी मागत होते, पण आमच्याकडचेही पाणी संपले होतेेे. आम्ही त्यांच्या अंगावर गंगाजल फेकले. माझ्या दुकानात काही जणांचा मृत्यू झाला होता.’ गुरुवारी गर्दी कमी होत गेली तरी रात्री ८ पर्यंत २.०६ कोटी लोकांनी डुबकी घेतली. उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार व डीजीपी प्रशांत कुमार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. शंकराचार्य- एकही मृत्यू झाला नसल्याचे सरकारने खोटे सांगितले शंकराचार्य अविमुक्तेशवरानंद यांनी खोटे बोलून सरकारने फसवल्याचा आरोप केला. कुंभमेळ्यात किरकोळ घटना झाली, एकही मृत्यू झाला नाही, असे सरकारने सांगितल्याचे ते म्हणाले. उपराष्ट्रपती धनखड उद्या जाणार, मोदींचे ५ तारखेला पवित्र स्नान पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ फेब्रुवारी राेजी कुंभमेळ्यात स्नान करणार आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे १ फेब्रुवारी राेजी सहकुटुंब जातील. ७३ देशांचे राजदूतही कुंभनगरीत येणार. सुरक्षा रक्षकाने अनेकांना वाचवले, एका महिलेचा पती हरवला सेक्टर २१ च्या उलटा किल्ला चौकातील सुरक्षा रक्षक शिवचरण सरोज म्हणाले, ‘पहाटे ४ वाजता लोक संगमावरून येत होते. तर झुंसी भागातून लोक संगमाकडे जात होते. त्याच वेळी चेंगराचेंगरी झाली. जो खाली पडला तो उठू शकत नव्हता. आम्ही अनेकांना वाचवले. काही जखमींना हल्दीरामच्या दुकानात नेले. दोघांना तर खाटेवरून आणले. बंगालच्या दुर्गापुरातील बिन्नूदेवी म्हणाल्या, ‘मी कशीतरी वाचले, पण नवरा हरवलाय.’ मौनी अमावास्येला झालेल्या चेंगराचेंगरीनंतर शेकडो लोक बेपत्ता झाले. कुंभनगरीतील १० हरवले-सापडले केंद्रांवर प्रचंड गर्दी आहे. संगमतटासोबतच परिसरात, रुग्णालये, तर अगदी पोस्टमाॅर्टेम हाऊसवरही जाऊन लोक शोध घेत आहेत. गुरुवारी लाऊडस्पीकरवरुन बेपत्ता लोकांची नावे घेतली जात होती. सर्वाधिक गर्दी सेक्टर ४ च्या बेपत्ता व्यक्तींची माहिती देणाऱ्या केंद्रावर आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजेपासून या ठिकाणच्या आठ काउंटरवर दर तासाला १०० ते १५० लोक चौकशीसाठी येत होते. बहुतेकांचे आप्तस्वकीय अमावास्येच्या दिवशीच बेपत्ता झाले. यात ७०% महिला आहेत. हरवले-सापडले केंद्र – ४ वरून लाइव्ह दुसऱ्या दुर्घटनेतील प्रत्यक्षदर्शी मनबहादूरसिंह म्हणाले, सेक्टर २१ मध्ये संगमतीरापेक्षा जास्त भयंकर चित्र होते. इथे असंख्य लोकांचे कपडे, चपलांचा खच पडला. बुधवारी रात्रीपर्यंत ७ ते ८ ट्रक ट्रॉली भरून त्या उचलल्या तरी ढिगारे होते. बेशुद्ध होऊन पडले लोक चौकातील चहा विक्रेती प्रतिभा म्हणाल्या, ‘चेंगराचेंगरी झाल्याने लोक बेशुद्ध होऊन पडले होते.’