कुंभमेळ्यात तिसरे अमृतस्नान आज; गर्दी व्यवस्थापनावर लक्ष:आखाड्यांचे स्नान ब्रह्ममुहूर्त 4.30 पासून सुरू, संगमावर पवित्र स्नानासाठी पुन्हा भाविकांची गर्दी

प्रयागराज कुंभमेळ्यात सोमवारी वसंत पंचमीस तिसरे अमृतस्नान होईल. यादरम्यान ५ कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. गर्दीचे व्यवस्थापन यावर प्रशासनाचे लक्ष असेल. मेळ्यात व्हीआयपी तसेच वाहनांना प्रवेश मिळणार नाही. पोलिसांची तैनाती प्रभावी राहावी यासाठी ६ टप्प्यांतील योजना आखली आहे. ११ संवेदनशील ठिकाणांवर अतिरिक्त पोलिस दल असेल. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार गर्दीवर नियंत्रणासाठी ‘ऑपरेशन इलेव्हन’योजना आहे. संगमाच्या घाटावरील दबाव रोखण्यासाठी अतिरिक्त पोलिस दल तैनात केले आहे. बॅरिकेडिंग वाढवली आहे. वाहनांची ये-जा रोखण्यात आल्याने भाविकांना ८-१२ किमी पायी चालावे लागत आहे. रविवारी रात्री ८ वाजेपर्यंत १.२९ कोटी लोकांनी स्नान केले. कुंभात आतापर्यंत ३४.९० कोटी लोकांनी स्नान केले. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्रपुरी म्हणाले, सर्व आखाड्यांत अमृतस्नानाची तयारी झाली आहे. साधूसंत पहाटे ४.३० वाजता स्नानासाठी संगमावर रवाना होतील. कुंभमेळानगरीत १२००, एसआरएनमध्ये ५०० मेडिकल फोर्स सतर्क : वसंत पंचमीच्या अमृत स्नानावरून प्रयागराज मंडळाच्या डॉक्टरांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. १२०० हून जास्त मेडिकल फोर्स कुंभात तैनात केले आहे. स्वरुपरानी नेहरू रुग्णालयातील ५०० कर्मचारी व टीबी सप्रू चिकित्सालयाच्या कर्मचाऱ्यांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. कुंभावरील टीकेमागे राजकारण : अवधेशानंद गिरी जुना आखाडाचे आचार्य महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी म्हणाले, राजकीय लाभासाठी काही लोक कुंभात उत्तर प्रदेश सरकारकडून केलेल्या व्यवस्थेवर टीका करत आहेत. हा राजकीय स्वार्थ आहे. त्यांनी कुंभमेळ्याच्या आयोजनाबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. ते म्हणाले, वसंत पंचमीवर सर्व आखाडा पूर्व नियोजनानुसार सहभागी होतील. २०० प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण कुंभात तैनातावर असलेल्या २०० प्रशिक्षित आयपीएस अधिकारी, एडीजीपी, प्रयागराज भानू भास्करसह इतर अधिकाऱ्यांनी गर्दी व्यवस्थापनातील बारकावे जाणून घेतले. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी मौनी अमावास्येला बेपत्ता झालेल्यांचा शोध घेणारे लोक अजूनही भटकत आहेत. सेक्टर २१ येथील शोध केंद्रात सापडलेल्या ७० वर्षीय शामाबाई यांचे नातेवाईक अमावास्येच्या दिवशी बेपत्ता झाले होते. तेव्हापासून त्या तिथेच आहेत. आप्तांविषयी बोलताना त्यांचे डोळे आपसुक पाणावतात. नेपाळचे रेणुमन राजवंशी यांना तर नीटपणे माहितीही देता येत नाही. शोध केंद्रातून हरवलेल्या लोकांची अजूनही माहिती जाहीर केली जात आहे.