मुंबई: मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी गेल्या काही महिन्यांपासून तिच्या विवाहसोहळ्यामुळं चर्चेत आहे. सोनालीनं गेल्या वर्षी ७ मे रोजी कुणाल बेनोडेकरशी दुबईतील एका मंदिरात लग्न केलं होतं. या लग्नात तिचे आई-बाबा देखील उपस्थित नव्हते. पण तरीही दोघांनी साधेपणानं लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण यासाठी त्यांच्या पालकांनी एक अट ठेवली होती. याबद्दल सोनालीनं नुकताच खुलासा केला.

सोनाली बस बाई बस या शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये तिनं अनेक विषयांवर गप्पा मारल्या. गप्पा मारताना तिनं तिच्या लग्नाबद्दलही अनेक खास गोष्टी शेअर केल्या आहेत. लॉकडाऊन असल्यानं मी आणि कुणालनं साधेपणानं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण मी एकुलती एक लेक असल्यानं थाटामाटात लग्न व्हावं, अशी घरच्यांची इच्छा होती. त्यामुळं त्यांनी त्या अटीवरच आम्हाला दुबईत रेजिस्टर लग्न करण्याची परवानगी दिली होती, असं सोनालीनं सांगितलं.


सनई चौघडे… फुलांच्या रंगीबेरंगी माळा… लग्नमंडप… जरतारीच्या पैठणीमध्ये, दागिन्यांमध्ये सजलेली नवरी, तर शेरवानीमध्ये राजबिंडा दिसणारा नवरा.. पाहुण्यांची लगबग, जेवणात मराठमोळा बेत.असा भव्य, पारंपरिक लग्नसोहळा सोनाली आणि कुणालचा लंडनमध्ये पार पडला. हा भव्यविविहासोहळा ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर पाहता येतोय. यावर एक प्रश्न विचारण्यात आला. त्याचं उत्तरही सोनालीनं दिलं. इतका शाही विवाहसोहळा पार पडला, याचा खर्च नेमका कोणी केलाय, ओटीटी कंपनीनं केलाय का? असा थेट प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर तिनं खरं काय ते सांगून टाकलं. काश… त्यांनी खर्च केला असता.. असं ती म्हणाली.


एखाद्या मराठी अभिनेत्रीचा लग्नसोहळा वेबविश्वात प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावरही ती व्यक्त झाली. सोशल मीडियावर मी काही मिनिटांचे व्हिडिओ फुकट टाकण्यापेक्षा, एक तासाचा पूर्ण व्हिडिओ चाहत्यांना पाहाता येईल. चाहत्यांना, प्रेक्षकांना कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल उत्सुकता असते. माझ्या लग्न सोहळ्यात त्यांनीही अप्रत्यक्षपणे सहभागी होता येईल , असा विचार करून लग्न ओटीटीवर आणता येईल, असा निर्णय घेतला, असं सोनाली म्हणाली.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.