लेकरांचे मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडीलांचा 15 किलोमीटर प्रवास:राऊत, वडेट्टीवारांकडून सरकारवर टीकास्त्र; हृदयद्रावक VIDEO

लेकरांचे मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडीलांचा 15 किलोमीटर प्रवास:राऊत, वडेट्टीवारांकडून सरकारवर टीकास्त्र; हृदयद्रावक VIDEO

आई – वडील गेल्याचे दुःख जगात सर्वात मोठे मानले जाते. मात्र त्यात स्वतःच्या पोटच्या मुलाला गमवण्याचे दुःख वाट्याला आले तर त्यांची काय अवस्था होते, हे न सांगितलेलेच बरे. अशाच दुःखात असताना गडचिरोली जिल्ह्यातील दाम्पत्यावर प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे त्यापेक्षाही वाईट वेळ आली आहे. दोन चिमुकल्यांचे मृतदेह आपल्याच खांद्यावर घेऊन पंधरा किलोमीटर पायपीट करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यावर आता राजकीय पडसाद देखील उमटले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यवस्थेचे भीषण वास्तव दर्शवणारा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक दाम्पत्य आपल्या खांद्यावर दोन मुलांचे मृतदेह घेऊन पायपीट करताना दिसत आहे. वेळेवर रुग्णवाहिक न मिळाल्यामुळे या गरीब आदिवासी दाम्पत्याला आपल्या लेकराचे मृतदेह आपल्याच खांद्यावर घेऊन जावे लागले. पोटचा गोळा गेल्याचे दुःख असताना दुसरीकडे प्रशासनाच्या कारभारामुळे या दुःखात भर टाकण्याचे काम केले गेले. त्यामुळे आता या घटनेवरून राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. संजय राऊत यांचा फडणवीस, एकनाथ शिंदेंवर हल्ला गडचिरोली जिल्ह्याचा काया पालट करणार असल्याचा दावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मात्र, त्यांचा दावा फोल ठरला असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आरोग्यव्यवस्थेच्या माध्यमातून जिल्ह्याचा काया पालट करण्यापेक्षा खाण उद्योग आणि त्यावर आधारीत आर्थिक व्यवहार आपल्या हातात असावे, यासाठीच हा जिल्हा स्वतःकडे ठेवला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यासाठी वेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. मात्र आजही आदिवासी हा जीवनासाठी संघर्ष करत आहे. आरोग्यवस्था नाही, रस्ते नाही, शाळेची व्यवस्था नाही, त्यामुळे आजही गर्भवती महिलांना देखील झोळीत टाकून प्रवास करावा लागत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे भीषण वास्तव – वडेट्टीवार या संदर्भात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील एका पोस्टच्या माध्यमातून राज्य सरकावर टीका केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आहे. आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. वेळेत उपचार मिळाले नाही. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. आईवडिलांनी दोन्ही भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेतले. चिखलातून वाट शोधत १५ किलोमीटर दूर अंतरावरचे अहेरी तालुक्यातील पत्तीगाव पायीच गाठले. गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव आज पुन्हा पुढे आले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा. हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ. दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असतात. दोघांनी एकदा जमिनीवर उतरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकं कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे.’

​आई – वडील गेल्याचे दुःख जगात सर्वात मोठे मानले जाते. मात्र त्यात स्वतःच्या पोटच्या मुलाला गमवण्याचे दुःख वाट्याला आले तर त्यांची काय अवस्था होते, हे न सांगितलेलेच बरे. अशाच दुःखात असताना गडचिरोली जिल्ह्यातील दाम्पत्यावर प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे त्यापेक्षाही वाईट वेळ आली आहे. दोन चिमुकल्यांचे मृतदेह आपल्याच खांद्यावर घेऊन पंधरा किलोमीटर पायपीट करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यावर आता राजकीय पडसाद देखील उमटले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यवस्थेचे भीषण वास्तव दर्शवणारा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक दाम्पत्य आपल्या खांद्यावर दोन मुलांचे मृतदेह घेऊन पायपीट करताना दिसत आहे. वेळेवर रुग्णवाहिक न मिळाल्यामुळे या गरीब आदिवासी दाम्पत्याला आपल्या लेकराचे मृतदेह आपल्याच खांद्यावर घेऊन जावे लागले. पोटचा गोळा गेल्याचे दुःख असताना दुसरीकडे प्रशासनाच्या कारभारामुळे या दुःखात भर टाकण्याचे काम केले गेले. त्यामुळे आता या घटनेवरून राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. संजय राऊत यांचा फडणवीस, एकनाथ शिंदेंवर हल्ला गडचिरोली जिल्ह्याचा काया पालट करणार असल्याचा दावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मात्र, त्यांचा दावा फोल ठरला असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. आरोग्यव्यवस्थेच्या माध्यमातून जिल्ह्याचा काया पालट करण्यापेक्षा खाण उद्योग आणि त्यावर आधारीत आर्थिक व्यवहार आपल्या हातात असावे, यासाठीच हा जिल्हा स्वतःकडे ठेवला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यासाठी वेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. मात्र आजही आदिवासी हा जीवनासाठी संघर्ष करत आहे. आरोग्यवस्था नाही, रस्ते नाही, शाळेची व्यवस्था नाही, त्यामुळे आजही गर्भवती महिलांना देखील झोळीत टाकून प्रवास करावा लागत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे भीषण वास्तव – वडेट्टीवार या संदर्भात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील एका पोस्टच्या माध्यमातून राज्य सरकावर टीका केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आहे. आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. वेळेत उपचार मिळाले नाही. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. आईवडिलांनी दोन्ही भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेतले. चिखलातून वाट शोधत १५ किलोमीटर दूर अंतरावरचे अहेरी तालुक्यातील पत्तीगाव पायीच गाठले. गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव आज पुन्हा पुढे आले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा. हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ. दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असतात. दोघांनी एकदा जमिनीवर उतरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकं कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे.’  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment