मुंबई: सध्या मुंबईत दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट आणि ठाकरेंमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अवघ्या दोन आठवड्यांवर दसरा येऊन ठेपलाय त्यापूर्वी आज गोरेगाव येथे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर ठाकरी शैलीत घणाघात केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गट, भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले- त्यांना अस्मान दाखवा

मुलं पळवणारी टोळी ऐकलीये. बाप पळवणारी औलाद आलीये. सत्तेचं दूध पाजलं आणि त्यांच्या तोंडाची गटारं उघडी पडलीत. मुंबईवर लचके तोडणाऱ्या गिधाडांची औलाद आहे. निजामशाह, आदिलशाहच्या कुळातील आताचे अमित शाह जे देशाचे गृहमंत्री आहेत. ते मुंबईत येऊन काय म्हणाले उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा. त्यांना तुम्ही अस्मान दाखवा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना सडेतोड उत्तर दिलं.

हेही वाचा –काँग्रेस-NCP सोबत संसार ते शिंदेंशी पंगा, ठाकरेंचं काय चुकलं? कीर्तिकरांनी थेट ठाकरेंच्या सभेत जाऊन सांगितलं!

आज गोरेगावच्या नेस्को संकुलात शिवसेनेच्या गटप्रमुखांचा विराट मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुका अशा सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज गोरेगावच्या नेस्को मैदानावर सभा झाली. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असं ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

हेही वाचा –मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, संजय राऊत तुरुंगात, पण उद्धव ठाकरेंच्या सभेत खुर्ची मात्र राखीव!

अमित शाह काय म्हणाले होते?

फक्त दोन जागांसाठी शिवसेनेने २०१४ मध्ये युती तोडली. शिवसेनेने आपल्या जागा पाडून पाठीत खंजीर खुपसला, उद्धव ठाकरेंनी धोका दिला, राजकारणात धोका सहन करु नका, जे धोका देतात, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे. मुंबईच्या राजकारणात भाजपचंच वर्चस्व राहिलं पाहिजे. आम्ही शिवसेनेला लहान केलं नाही, शिवसेना स्वतःच्या निर्णयांमुळे छोटी झाली, खयाली पुलाव शिजवल्यामुळे शिवसेना फुटून त्यांची वाईट अवस्था झाली, असंही शाह म्हणाले.

दरवर्षीप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार, पक्षप्रमुखांनी दिले आदेशSource link

Leave a Reply

Your email address will not be published.