चोर सोडून संन्याशाला फाशी:महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी पंतप्रधान मोदींना जाब विचारला त्यात गैर काय? वडेट्टीवारांचा सवाल

चोर सोडून संन्याशाला फाशी:महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी पंतप्रधान मोदींना जाब विचारला त्यात गैर काय? वडेट्टीवारांचा सवाल

‘चोर सोडून संन्याशाला फाशी‘ कोसळलेल्या पुतळा प्रकरणी आरोपी असलेले सगळे फरार.पु तळा का कोसळला याबाबत जाब विचारणारे पोलिसांच्या ताब्यात. हा कुठला न्याय आहे ? असा प्रश्न विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली आहे. या देशांमध्ये लोकशाही आहे की हुकुमशाही आहे? असा प्रश्न विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. या देशांत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या संदर्भात संविधानिक मार्गाने आंदोलन करणार असताना सर्व लोकांना अटक करण्याचे काम, घरामध्ये पहारा बसवण्याचे काम, घराबाहेर पडू न देण्याचा निर्णय हे सरकार घेते. त्यामुळे हे सरकार गोंधळलेले आणि घाबरलेले असल्याचा दिसून येत आहे. नरेंद्र मोदींचा दौरा आहे, म्हणून शांततेच्या मार्गाने निदर्शने करणे हा गुन्हा आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या शिल्पकाराला तुम्हाला अटक करता येत नाही. त्याबद्दल माफी मागता येत नाही, शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात देखील तुम्ही कमिशन खाता? म्हणून तुम्हाला भीती वाटते का? या सर्व गोष्टींचा खुलासा सरकारने केला पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. पालघर मध्ये देखील तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही हुकुमशाही आणि दादागिरी आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, हे लक्षात ठेवा, असा इशारा देखील वडेट्टीवार यांनी दिला आहे. अशा पद्धतीने कार्यकर्त्यांवर तुम्ही पाळत ठेवत आहोत. त्यांच्या घरापुढे तुम्ही पोलिस उभे करत आहात, खासदार वर्षा गायकवाड यांना दरवाजाच्या बाहेर पडू देत नाहीत. आमच्या सर्व काँग्रेसच्या नेत्यांना अरेस्ट करत आहात. त्यांनी काय गुन्हा केला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या पद्धतीने सरकार जनतेचा आवाज दाबत असेल तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे स्वाभिमान आहेत. जसा पुतळा कोसळला तसेच तुम्ही देखील कोसळणार आहात, हे लक्षात ठेवा, असा इशारा देखील वडेट्टीवार यांनी दिला आहे. तुमच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेली असेल आणि सत्तेच्या मस्तपाई तुम्ही लोकशाहीचा गळा घोटात असाल तर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. विजय वडेट्टीवार यांनी केलेली पोस्ट देखील पहा…. ‘चोर सोडून संन्याशाला फाशी‘ कोसळलेल्या पुतळा प्रकरणी आरोपी असलेले सगळे फरार.पु तळा का कोसळला याबाबत जाब विचारणारे पोलिसांच्या ताब्यात. हा कुठला न्याय आहे ? पंतप्रधानांनी स्वतः ज्या पुतळ्याचे अनावरण केले तो पुतळा कोसळून आज ४ दिवस झाले. अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या १३ कोटी जनतेची माफी मागितली नाही. माफी तर सोडा दुःख ही व्यक्त केले नाही. आमच्या महाराष्ट्राच्या राजाचा अपमान झाला यावर जनतेने व्यक्त सुद्धा होऊ नये का? छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रती असलेल्या अस्मितेखातर आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी पंतप्रधान मोदींना जाब विचारला त्यात गैर काय? ही दडपशाही नाही चालणार.. जय भवानी..जय शिवाजी..!

​‘चोर सोडून संन्याशाला फाशी‘ कोसळलेल्या पुतळा प्रकरणी आरोपी असलेले सगळे फरार.पु तळा का कोसळला याबाबत जाब विचारणारे पोलिसांच्या ताब्यात. हा कुठला न्याय आहे ? असा प्रश्न विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली आहे. या देशांमध्ये लोकशाही आहे की हुकुमशाही आहे? असा प्रश्न विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. या देशांत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या संदर्भात संविधानिक मार्गाने आंदोलन करणार असताना सर्व लोकांना अटक करण्याचे काम, घरामध्ये पहारा बसवण्याचे काम, घराबाहेर पडू न देण्याचा निर्णय हे सरकार घेते. त्यामुळे हे सरकार गोंधळलेले आणि घाबरलेले असल्याचा दिसून येत आहे. नरेंद्र मोदींचा दौरा आहे, म्हणून शांततेच्या मार्गाने निदर्शने करणे हा गुन्हा आहे का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या शिल्पकाराला तुम्हाला अटक करता येत नाही. त्याबद्दल माफी मागता येत नाही, शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात देखील तुम्ही कमिशन खाता? म्हणून तुम्हाला भीती वाटते का? या सर्व गोष्टींचा खुलासा सरकारने केला पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. पालघर मध्ये देखील तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही हुकुमशाही आणि दादागिरी आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, हे लक्षात ठेवा, असा इशारा देखील वडेट्टीवार यांनी दिला आहे. अशा पद्धतीने कार्यकर्त्यांवर तुम्ही पाळत ठेवत आहोत. त्यांच्या घरापुढे तुम्ही पोलिस उभे करत आहात, खासदार वर्षा गायकवाड यांना दरवाजाच्या बाहेर पडू देत नाहीत. आमच्या सर्व काँग्रेसच्या नेत्यांना अरेस्ट करत आहात. त्यांनी काय गुन्हा केला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या पद्धतीने सरकार जनतेचा आवाज दाबत असेल तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे स्वाभिमान आहेत. जसा पुतळा कोसळला तसेच तुम्ही देखील कोसळणार आहात, हे लक्षात ठेवा, असा इशारा देखील वडेट्टीवार यांनी दिला आहे. तुमच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेली असेल आणि सत्तेच्या मस्तपाई तुम्ही लोकशाहीचा गळा घोटात असाल तर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. विजय वडेट्टीवार यांनी केलेली पोस्ट देखील पहा…. ‘चोर सोडून संन्याशाला फाशी‘ कोसळलेल्या पुतळा प्रकरणी आरोपी असलेले सगळे फरार.पु तळा का कोसळला याबाबत जाब विचारणारे पोलिसांच्या ताब्यात. हा कुठला न्याय आहे ? पंतप्रधानांनी स्वतः ज्या पुतळ्याचे अनावरण केले तो पुतळा कोसळून आज ४ दिवस झाले. अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या १३ कोटी जनतेची माफी मागितली नाही. माफी तर सोडा दुःख ही व्यक्त केले नाही. आमच्या महाराष्ट्राच्या राजाचा अपमान झाला यावर जनतेने व्यक्त सुद्धा होऊ नये का? छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रती असलेल्या अस्मितेखातर आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी पंतप्रधान मोदींना जाब विचारला त्यात गैर काय? ही दडपशाही नाही चालणार.. जय भवानी..जय शिवाजी..!  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment