नवी दिल्ली: Lenovo New Tab Launched: लेनोवोने (Lenovo) ने भारतीय बाजारात आपल्या नवीन टॅबलेटला लाँच केले आहे. कंपनीने Lenovo Tab P12 Pro ला सादर केले आहे. या टॅबमध्ये Android १२L अपडेटसह अँड्राइड १३ डेव्हलपर प्रीव्ह्यू मिळेल. लेनोवोच्या या टॅबलेटच्या खास फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये १२.६ इंच डिस्प्ले, डॉल्बी एटमॉस साउंड आणि १०,२०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. या शानदार टॅबलेटची किंमत ६९,९९९ रुपये आहे. तुम्ही टॅबला कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइट Amazon India वरून खरेदी करू शकता. हा टॅब केवळ स्टॉर्म ग्रे कलर व्हेरिएंटमध्ये येतो. Lenovo Tab P12 Pro च्या फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

वाचा: Prepaid Plans: जिओला टक्कर देतो ‘या’ कंपनीचा अवघ्या १९ रुपयांचा प्लान, अनलिमिटेड कॉलिंग-डेटाचा मिळेल फायदा

Lenovo Tab P12 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Lenovo Tab P12 Pro मध्ये १२.६ इंच एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २५६०x१६०० पिक्सल आहे. हा डिस्प्ले स्लिम बेझल्स आणि गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शनसह येतो. टॅबची बॉडी मेटलची आहे, जे याला प्रीमियम लूक देतात. टॅबमध्ये ८ जीबी LPDDR५ रॅम आणि २५६जीबी UFS ३.१ स्टोरेज दिले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवू शकता. यात स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेटचा सपोर्ट मिळतो.

वाचा: Broadband Plans: ‘या’ प्लानने वाढविले जिओचे टेन्शन, अर्ध्या किमतीत मिळताहेत सर्व बेनेफिट्स, युजर्ससाठी बेस्ट ‘हा’ प्लान एकदा पाहाच

लेनोवोच्या या टॅबमध्ये फोटोग्राफीसाठी बॅक पॅनेलवर दोन कॅमेरे दिले आहेत. यात १३ मेगापिक्सल वाइड अँगल कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. डॉल्बी व्हिजन सपोर्टसह येणाऱ्या या टॅबमध्ये ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणारी १०,२०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, फुल चार्जमध्ये ही बॅटरी १५ तासांचा ऑनलाइन व्हिडिओ प्लेबॅक ऑफर करते. या टॅबचे वजन ५६५ ग्रॅम आहे. दरम्यान, तुम्ही जर थोडे जास्त पैसे खर्च करून दमदार फीचर्ससह येणारा प्रीमियम टॅब खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Lenovo Tab P12 Pro एक चांगला पर्याय ठरेल.

वाचा: Data Plans: बेस्टच !३०० रुपयांपेक्षा कमीमध्ये डेली ३ GB डेटा देणाऱ्या ‘या’ प्लानने उडविली Vi-Airtel ची झोप, पाहा डिटेल्सSource link

Leave a Reply

Your email address will not be published.