डेहराडून: डेहराडूनच्या सचिन कोठारीने त्याची चांगली नोकरी सोडून एक उद्योग सुरु करण्याचं ठरवलं. त्यासाठी त्याने मेहनत घेतली आणि तो यशस्वी देखील झाला. आज तो त्या व्यवसायातून वर्षाला ३० लाख रुपये कमावतो आहे. जे कुठल्याही साध्या कॉर्पोरेट नोकरीमध्ये त्याला शक्य झालं नसतं. सचिन याचं संपूर्ण आयुष्य त्याच्या लॅपटॉपभोवती फिरत होतं. २००८ ते २०११ या काळात त्याने दिल्लीत चार नोकऱ्या बदलल्या, पगारवाढ चांगली मिळाली पण परिस्थिती बदलली नाही. कॉर्पोरेट जॉबचा ताण त्याला मानवला नाही. डोळ्यांसमोर लॅपटॉपची स्क्रीन, पण मनात डोंगरावरील हिरवळ. एक दिवशी त्याने अखेर निश्चय केला आणि नोकरी सोडून घरी परतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरला आणि आज ते त्याचं आवडतं काम करत आहेत आणि नोकरीत जेवढे शक्य नव्हते तेवढे कमावत आहेत.

नातेवाईकाला पाहून सचिनला डेहराडूनमध्ये नर्सरी उघडण्याची कल्पना सुचली. सचिनने नोकरी करत असताना नर्सरी उघडण्याच्या पर्यायांवर संशोधन केले होते. त्याने त्याच्या एका मित्राची मदत घेतली ज्याच्याकडे जमीन होती. यानंतर दोघांनी नर्सरीत ६ लाख रुपये गुंतवण्याचे ठरवले.

अर्धी बचत आणि वडिलांकडून काही पैसे उधार

सचिनकडे दीड लाख रुपयांची बचत होती आणि तेवढीच रक्कम वडिलांकडून त्याने उसने घेतली होती. त्याच्या मित्राने त्याच्या बाजूने ३ लाख दिले. अशाप्रकारे २०१२ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन त्याने नर्सरी सुरू केली. त्याला ‘देवभूमी नर्सरी’ असे नाव देण्यात आले. त्याची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. अनेक प्रयत्न करूनही झाडांना कीटकांचा प्रादुर्भाव झाला आणि त्यापैकी बहुतेक झाडं की मरण पावली.

हेही वाचा-चार महिने सैन्यात नोकरी, नंतर समजलं भरती झालीच नाही, तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली

मित्र हिम्मत हारला, पण सचिन थांबला नाही

यामुळे त्याच्या व्यवसायात भागीदार बनलेल्या त्याच्या मित्राच्या हिम्मतीचा बांध फुटला आणि त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला. आता सचिन एकटा पडला. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला सांगितले की, त्याने आता स्वत:साठी चांगली नोकरी शोधावी, पण सचिनला ते मान्य नव्हते.

पुढील तीन वर्षे म्हणजे २०१५ पर्यंत नर्सरी पुन्हा सुरू करण्यात तो व्यस्त झाला. त्याने इतर तज्ज्ञांकडून बागकाम शिकून घेतलं, यूट्यूब वरून नर्सरी काळजीचे बारकावे शिकले. नातेवाईकाचे मार्गदर्शन घेतले. यानंतर त्यांनी शहरापासून १५ किमी अंतरावर जमीन भाड्याने घेऊन रोपवाटीका सुरू केली. मात्र, आज त्यांच्याकडे स्वतःची १५०० चौरस फूट जमीन आहे.

फुलांचे २० प्रकार, भाज्यांचीही झाडं

हळूहळू त्याची नर्सरी सुरू झाली. यामध्ये विविध फुलांचे सुमारे २० प्रकार आहेत. याशिवाय ब्रोकोली, टोमॅटो, बोक चॉय, वांगी, फ्लॉवरची झाडेही त्यात लावली आहेत. याच्या विक्रीतून त्यांना दरवर्षी सुमारे ३० लाख रुपये मिळतात. सहारनपूर, गाझियाबाद, चंदीगड, दिल्ली, जालंधर, लुधियाना आणि अमृतसरपर्यंत त्याच्या झाडांना मागणी आहे. आज तो आनंदी आहे की त्याच्याकडे त्याचे मन, धन, आरोग्य आणि मनःशांती आहे. त्याने नोकरी सोडण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता असं तो आजही मानतात.

हेही वाचा-जावयांकडे गाड्या, पण सासुरवाडीला येईनात, लेकी हिरमुसल्या, कारण तरी काय?

ऑफिसमध्ये सगळेच माझ्याकडे वाईट नजरेनं पाहायचे; तृतीयपंथी म्हणून आधी स्ट्रगल आणि आज LLBची पदवीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *