रवी राऊत, यवतमाळ: शेतकऱ्यांचा वार्षिक महत्वाचा पोळा सण नुकताच महाराष्ट्रभर साजरा झाला. आता गणरायाचे आगमन होत आहे. हे होत असताना विदर्भात वर्षभरात शेतकऱ्यांच्या १५८४ आत्महत्या झाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये पाच कर्जबाजारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय अत्यंत गंभीर असल्याने संसदेच्या विशेष सत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर चर्चा करुन केंद्र सरकारने दिलासा द्यावा,अशी मागणी शेतकरी नेते तसेच शिवसेनेचे ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील गेल्या काही दिवसात पाच शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील प्रवीण काळे (हिवरी), त्र्यंबक केराम (खडकी), मारोती चव्हाण(शिवणी), गजानन शिगणे (अर्जुना),देवीचंद राठोड(बाणगाव) अशी त्या शेतकऱ्यांची नावं आहेत.

२०२३ मध्ये विदर्भात १५८४ विक्रमी शेतकऱ्यांच्या आत्महत्यां झाल्या असून या होत असलेल्या शेतकरी आत्महत्यांना केंद्र व राज्य सरकारचे चुकीचे धोरणच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्राच्या स्व. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे माजी अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे. १९९७ पासून शेतकरी आत्महत्यांचा मागोवा घेणारे आणि शेतकऱ्यांच्या दुर्दैवी स्थितीला आंतरराष्ट्रीय पातळीवर आणणारे ज्येष्ठ शेतकरी कार्यकर्ते किशोर तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, चालू वर्षात विदर्भाच्या ग्रामीण भागात विविध संकटामुळे १५८४ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. ही गेल्या काही वर्षातील सर्वाधिक आकडेवारी असल्याचं ते म्हणाले.

सध्या संपूर्ण विदर्भात शेतकरी मागील वर्षीच्या कापूस आणि सोयाबीनच्या दरातील मंदीमुळे तसेच प्रचंड नापिकी मुळे आर्थिक संकटात आले आहेत. लागवडीचा खर्च अतिशय वाढल्यामुळे व बँकांनी अपुरे पीककर्ज वाटप केल्यामुळे या आत्महत्या होत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे.

लागवडीचा खर्च, नियंत्रण,हमीभाव,पीकपद्धती आणि पतपुरवठा धोरण,पीक विमा योजना यासंबंधीचे मुख्य प्रश्नाकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार लक्ष देत नाही. राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. कोलमडलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदत पॅकेजेस कोणताही दिलासा देत नाहीत. राजकीय नेतृत्वाचा अभाव आणि व्यवस्थेतील अनियंत्रित भ्रष्टाचारामुळे विदर्भातील सर्वात मागासलेला प्रदेश आहे, असे किशोर तिवारी यांनी गावांना भेटी दिल्यानंतर सांगितले.

लोकसभा निवडणूक वेळेवर होणार पण महाराष्ट्रात मध्यावधी लागणार, विनायक राऊतांचा खळबळजनक दावा, म्हणाले..
खूप कमी मागणी असलेल्या कापूस या मुख्य नगदी पिकामुळे विदर्भाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. लागवडीचा खर्चामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बँकांद्वारे अत्यंत कमी पीककर्जामुळे संकटात आणखी भर पडली आहे. शाश्वतपीक अन्न ,डाळी आणि तेलबिया पिकांना प्रोत्साहन देण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असं किशोर तिवारी म्हणाले.
रोहित आणि द्रविड यावेळी तुम्ही.. संघात स्थान मिळाल्यावर अश्विनची पहिली प्रतिक्रीया व्हायरल

पॅकेज जाहीर करा..

विदर्भातील अत्यंत लहान प्रदेशात दररोज एकापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या होत असताना, नजीकच्या भविष्यात ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा भारताचा दावा फोल ठरत आहे. संसदेच्या विशेष सत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर सरकारने चर्चा करून तसेच नरेंद्र मोदी यांनी विदर्भाचा दौरा करून शेतकऱ्यांना आत्महत्येला भाग पाडणाऱ्या प्रमुख समस्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याचे आवाहन किशोर तिवारी यांनी पंतप्रधानांना केले आहे.

Weather Forecast : महाराष्ट्रातील तहानलेल्या भागाची चिंता मिटणार; पुढील ३ दिवसांत पाऊस बरसणार, असा आहे ताजा अंदाज

शेतकरी बळीराजावरील संकट दूर कर, धनंजय मुंडेंचे बाप्पाला साकडंSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *