सेंट किट्स : वेस्ट इंडिजबरोबरच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात रोहित शर्माला गंभीर दुखापत झाली होती. धडाकेबाज फलंदाजीनंतर रोहितला मैदान सोडावे लागले होते. त्यामुळे त्याच्या दुखापतीबाबत कोणालाच जास्त माहिती नव्हती. पण आता रोहितने आपल्या या दुखापतीबाबत पहिली प्रतिक्रीया दिली आहे.

वाचा-भारत-वेस्ट इंडिजमधील अमेरिकेतील सामने रद्द झाले तर कुठे होणार, जाणून घ्या मास्टर प्लॅन

वेस्ट इंडिजने भारतापुढे विजयासाठी १६५ धावांचे आव्हान दिले होते, या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा मैदानात उतरला होता. रोहितने एक षटकार आणि एक चौकार लगावला. रोहितने ५ चेंडूंत ११ धावा केल्या आणि त्याला दुखापत झाली. ही दुखापत एवढी गंभीर होती की, त्याला चालताही येत नव्हते. पण आता या दुखापतीबाबत रोहितने स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

वाचा-भारताला एकहाती विजय मिळवून दिल्यावर सूर्यकुमार यादवसाठी आली गूड न्यूज, पाहा काय घडलं…

याबाबत रोहित म्हणाला की, ” फलंदाजी करत असताा मला दुखापत झाली, पण आता मी ठीक आहे. त्याचबरोबर आता चौथा सामना खेळवण्यात काही दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे मी या दिवसांमध्ये फिट होईन, अशी मला आशा आहे.” पण अजूनही रोहित पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे जर तो पूर्णपणे फिट नसले तर भारतीय संघापुढे मोठे आव्हान उभे राहू शकते.

नेमकं घडलं तरी काय होतं, पाहा…
वेस्ट इंडिजने यावेळी प्रथम फलंदाजी करत असताना भारतापुढे १६५ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा मैदानात उतरला होता. गेल्या सामन्यात रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. त्यामुळे या सामन्यात रोहित कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. रोहितने यावेळी धडाकेबाज फटकेबाजीला सुरुवात केली. रोहितने एक षटकार आणि एच चौकार लगावत ५ चेंडूंत ११ धावा केल्या. पण त्यानंतर मैदानात त्याला असह्य वाटू लागले. त्यावेळी भारताच्या डॉक्टरांनी मैदानात घाव घेतली. भारताच्या डॉक्टरांनी मैदानात रोहितची तपासणी केली. पण रोहितला यावेळी नीट उभे राहता येत नव्हते. कारण रोहितच्या कंबरेतील स्नायू दुखावल्याचे वाटत होते. ही दुखापत गंभीर स्वरुपाची होती. त्यामुळे रोहितला या वेदना सहन होत नव्हत्या. त्यामुळेच रोहित शर्माने यावेळी मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.