मुंबई : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरवीसी) बोरिवली आणि विरार दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम एक डिसेंबरपासून हाती घेणार आहे. कॉरिडॉरच्या प्रस्तावित मार्गावर असलेले अडथळे हटवणे, हे प्राथमिक काम असेल.

आत्तापर्यंत, पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय भागात चर्चगेट ते मुंबई सेंट्रल आणि बोरिवली ते विरार या चार मार्गांचा समावेश आहे. मुंबई सेंट्रल ते बोरिवलीपर्यंत पाचवी, तर खार आणि गोरेगाव दरम्यान सहावी मार्गिका आहे.

सहावी मार्गिका २०२५ च्या अखेरीस बोरिवलीपर्यंत वाढवण्याची योजना आहे. मेल-एक्स्प्रेस आणि मुंबई सेंट्रल आणि विरार दरम्यान उपनगरी विभागातील रेल्वे वाहतूक प्रभावीपणे वेगळी करणे, हे लाइन विस्तार प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. यामुळे पश्चिम रेल्वेच्या कार्यक्षमतेला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

डिलाईल ब्रिजचे परस्पर ‘उद्घाटन’ महागात, आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाच्या नेत्यांवर गुन्हा
“मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी) ३अ अंतर्गत कार्यान्वित होणाऱ्या या प्रकल्पासाठी दिलेले हे पहिले कंत्राट आहे” अशी माहिती एमआरवीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस सी गुप्ता यांनी दिली.

नवी मुंबई मेट्रो अखेर धावली, पण महाग तिकिटांवरुन प्रवासी नाराज, नेमकं म्हणणं काय?
बुकिंग ऑफिस, रिले रूम, टॉयलेट ब्लॉक्स आणि ऑफिसेससह एकूण ४७ रेल्वेसंबंधित वास्तू, अतिरिक्त ट्रॅकसाठी मार्ग तयार करण्यासाठी पाडल्या जाणार आहेत. फूट ओव्हर ब्रिजच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया १० डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

अवघा रंग एक झाला.. रंगि रंगला श्रीरंग ।।

एमआरवीसीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तसेच भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. या मार्गात येणारी झाडे तोडण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे सादर करण्यात आला आहे.

Read Latest Mumbai Updates And Marathi News



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *