सोयगावात गौण खनिजाची लूट:प्रशासनाचे झाले दुर्लक्ष, रॉयल्टी व परवाना नसतानाही वाहतुक
लागोपाठ शासकीय सुट्ट्यांचा पुरेपूर लाभ घेत शासनाची रॉयल्टी व वाहतुक परवाना नसतांना शासनाच्या गौण खनिजाची लुट केली जात आहे. या परिसरातील सोनससवाडी शिवारातील. गट क्रमांक ५४ मधे जेसीबी,चार ट्रॅक्टर व ट्रॉलीच्या सहाय्याने हजारो ब्रॉस गौण खनिजाची (मुरूम) शनिवार,रविवार व सोमवारी दिवसा चोरून नेला जात आहे. या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी व तसेच महसुल बुडविणाऱ्या माफियांवर कायद्याचा जरब बसावा अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे. सोयगाव महसूल विभागाला माहिती देऊनही कारवाई होत नाही. यामुळे महसूल प्रशासनाच्या आर्थिक देवाण घेवाणीतून गौण खनिजांची दिवसा ढवळ्या चोरी होत असल्याचा जनतेत प्रशासनाविषयी नाराजीचा सूर उमटत आहे. गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सोमवारी महसुलाची कोणतीही रॉयल्टी व वाहतुकीचा परवाना नसतांना महादेव मंदिासमोरील एकनाथ बोडखे यांच्या शेतातील मुरूम जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन करुन ट्रॅक्टर-ट्रॉलीने सोयगाव – जरंडी रस्त्याने वाहतूक करण्यात येत आहे. यातील मुरूम खाजगी कामासाठी सर्रास वापर होत आहे. कामचुकार व चेरीमेरी वृत्ती वाढल्याने शासनाच्या विभातीत पाठराखण करणारे कर्मचारी गौण खनिज व्यवसाईकास भ्रमणध्वनी वरुन त्वरीत संपर्क करून निसटण्यासाठी सांगतात.प्रशासनातील कामचुकार व चेरीमेरी वृत्ती वाढल्याने शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाला चुना लागला आहे.