भगवान गडानंतर आता देशमुख हत्या प्रकरणात नारायण गडही दाखल:महंत शिवाजी महाराज आज मस्साजोगला भेट देणार

भगवान गडानंतर आता देशमुख हत्या प्रकरणात नारायण गडही दाखल:महंत शिवाजी महाराज आज मस्साजोगला भेट देणार

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात याआधी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी एन्ट्री केली होती. त्यानंतर आता नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज हे देखील आता या प्रकरणात देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. नामदेव शास्त्री यांनी या आधी मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करत त्यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे राज्यभरातून त्यांच्या या निर्णयाला चांगलाच विरोध झाला होता. देशमुख कुटुंबीयांनी देखील नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन त्यांना सर्व माहिती दिली. त्यानंतर नामदेव शास्त्रींनी देखील देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे सांगितले होते. आता महंत शिवाजी महाराज हे देखील मस्सोजग येथे भेट देणार असल्याने, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची बाजू घेत त्यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर राज्यभरात बराच खल झाला. अखेर नामदेव शास्त्री यांनी देखील देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले. तर आता बीडच्या राजकारणात नारायण गडाला देखील तेवढेच महत्त्व आहे. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज हे देशमुख कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मस्साजोग येथे जाणार आहेत. महंत शिवाजी महाराज हे धनंजय देशमुख, वैभवी देशमुख आणि देशमुख कुटुंबातील सदस्यांची तसेच गावातील नागरिकांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता महंत शिवाजी महाराज हे काय भूमिका मांडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बीडच्या राजकीय इतिहासात भगवानगड तसेच नारायण गडाचे महत्त्व मोठे आहे. नारायण गड येथील नगद नारायण सर्वच समाजातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळेच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपल्या आंदोलनाची सुरुवात ही नारायण गडाचे दर्शन घेऊनच केली होती. नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा झाली होती. तसेच नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बीड जिल्ह्यातील अनेक राजकीय घडामोडींचे केंद्र म्हणून देखील नारायण गडाकडे पाहिले जाते. देशमुख कुटुंबीयांनी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली होती संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी भगवान गडावर महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने नामदेव शास्त्रींना थेट सुनावले. आपण माझ्यापेक्षा खूप मोठे आहात, तमाम भक्तांचे गुरू आहात पण आपण केलेले विधान हे आम्हाला पटले नाही, अशा शब्दांत वैभवीने महंत शास्त्रींना ऐकवले. या भेटीत धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुखांच्या खूना मागील खरे कारण, आरोपींचा इतिहास, त्यांची गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, त्यांच्यावरील गुन्ह्यांचा कच्चाचिठ्ठाचा महाराजांपुढे मांडला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुख यांना नाहक लक्ष्य केले जात आहे, असे म्हणत नामदेव शास्त्री यांनी धनंजय देशमुख यांची पाठराखण केली होती. शिवाय हत्येपूर्वी आरोपींची मानसिकता सुद्धा तपासावी, असे म्हणत काही नेत्यांनी जातीयवाद उफाळून आणल्याचे ते म्हणाले होते. यामुळे नामदेव शास्त्री महाराजांवर चोहोबाजूने टीका केली जात आहे. त्यानंतर नामदेव शास्त्रींना आपली आपली बाजू समजावून सांगण्यासाठी देशमुख कुटुंबीय भगवान गडावर गेले होते.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment