लॉर्ड्सवर 11 जूनपासून खेळवली जाईल WTC फायनल:इंग्लंड तिसऱ्यांदा यजमानपद भूषवणार; 16 जून हा राखीव दिवस
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या चालू हंगामातील अंतिम सामना पुढील वर्षी 11 ते 15 जून दरम्यान लॉर्ड्स स्टेडियमवर खेळवला जाईल. आयसीसीने मंगळवारी विजेतेपदाच्या सामन्याची तारीख आणि ठिकाण जाहीर केले. 16 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. लंडनमधील लॉर्ड्स स्टेडियम प्रथमच WTC फायनलचे आयोजन करणार आहे. अंतिम सामना पॉइंट टेबलमधील टॉप-2 संघांमध्ये होईल. सध्या भारतीय संघ 68.52 टक्के गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया (62.50%) दुसऱ्या स्थानावर आहे. ICC ने X पोस्टद्वारे WTC फायनलची तारीख आणि ठिकाण जाहीर केले… इंग्लंड तिसऱ्यांदा WTC फायनलचे यजमानपद भूषवणार इंग्लंड तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं यजमानपद भूषवणार आहे. चॅम्पियनशिपचा पहिला अंतिम सामना साउथॅम्प्टन येथील रोझ बाउल मैदानावर खेळला गेला, तर दुसरा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर आयोजित करण्यात आला. भारताने दोन्ही फायनल खेळल्या, न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलियाने हरवले दोन्ही वेळा संघाला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशिपच्या दोन्ही अंतिम फेरीत पोहोचला आहे. 2021 मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून 8 गडी राखून पराभव झाला होता. तर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा 209 धावांनी पराभव केला होता.