अहमदाबाद: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला. सलग १० सामने जिंकून अंतिम फेरी गाठणाऱ्या टीम इंडियाला ऑस्ट्रेलियानं ६ गडी राखून पराभूत केलं आणि सहाव्यांदा विश्वविजेतेपद पटकावलं. कर्णधार पॅट कमिन्सनं पहिल्या डाव्यात आखलेली व्यूहरचना आणि योग्य वेळी गोलंदाजीत केलेले बदल यामुळे भारताला केवळ २४० धावांत संपुष्टात आला. स्पर्धेत प्रथमच भारतीय संघ ऑल आऊट झाला.लग्न करताच दुसऱ्याच वर्षी वर्ल्डकप विजय असा योगायोग पॅट कमिन्ससोबत जुळून आला. २०२२ मध्ये पॅट कमिन्स त्याच्या प्रेयसीसोबत विवाह बंधनात अडकला. बेकी बोस्टनसोबत कमिन्सचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. जुलै २०२२ मध्ये त्यांनी लगीनआठ बांधली. यानंतर जवळपास सव्वा वर्षांनी कमिन्सच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियानं वर्ल्डकप जिंकला. असाच योगायोग याआधी रिकी पॉटिंग, महेंद्रसिंग धोनी आणि इयन मॉर्नगसोबत जुळून आला आहे.ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगनं २००२ मध्ये लगीनगाठ बांधली. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजेच २००३ मध्ये त्याच्या नेतृत्त्वाखाली कांगारुंनी विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. त्यांनी अंतिम सामन्यात भारताचा १२५ धावांनी पराभव केला. महेंद्रसिंग धोनीनं साक्षी सिंग रावतसोबत २०१० मध्ये लग्न केलं. त्यानंतर २०११ मध्ये भारतानं एकदिवसीय विश्वचषक जिंकला. त्यावेळी धोनीकडे संघाची धुरा होती. इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गननं २०१८ मध्ये त्याच्या प्रेयसीसोबत लग्नगाठ बांधली. २०१८ मध्ये इंग्लंडचा संघ विश्वविजेता ठरला.लव्ह, लग्न, लक आणि वर्ल्डकप असा योगायोग आता पॅट कमिन्ससोबत जुळून आला आहे. आयसीसीच्या दोन स्पर्धा एकाच वर्षात जिंकणाा पहिला कर्णधार ठरण्याचा मानही त्यानं पटकावला. पाचच महिन्यांपूर्वी कमिन्सच्या नेतृत्त्वात कांगारुंनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली होती. त्यावेळीही त्यांनी अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा कमिन्सच्या संघानं भारताच्या जेतेपदाचं स्वप्नावर पाणी फिरवलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *