मुंबई- एखाद्या सिनेमात शोभावी अशी ही कथा कॉमेडी क्वीन अभिनेत्री श्रेया बुगडे हीची लाईफ स्टोरी आहे. निर्माता निखिल शेठसोबत श्रेयाची ओळख झाली ती भांडणातच, पण निखिलला त्याच्या एका विशेष कामासाठी श्रेयाने अभिनंदनाचा फोन केला आणि त्यानंतर ते सगळं भांडण मागे पडलं आणि हृदयातली गिटार कधी वाजली ते दोघांनाही कळलं नाही. आज श्रेया बुगडे आणि निखिल शेठ हे एकेकाळचे भांडकुदळ मित्र ते आजचे रोमांटिक कपल म्हणून त्यांच्या आयुष्याचा प्रवास करत आहेत.

अभिनेत्री गरोदर, चाहते म्हणाले ‘मुलगा होत नाही तोपर्यंत बाळांना जन्म देणार’

विनोदी अभिनेत्री म्हणून ऑन कॅमेरा प्रत्येकालाच माहीत असलेली श्रेया वैयक्तिक जीवनातदेखील अशीच दिलखुलास आणि मनमुराद आनंद घेणारी आहे. श्रेयाच्या आयुष्याचा जोडीदार म्हणजे निखिल मनोरंजनाच्या क्षेत्रात निर्माता म्हणून काम करतो. त्या दोघांची ओळख कशी झाली त्याचा किस्सा श्रेयाने शेअर केला आहे.


श्रेया सांगते, ‘माझी आणि निखिलची ओळख एका मालिकेच्या निमित्ताने झाली. त्या मालिकेत माझी छोटीशी भूमिका होती पण या मालिकेचा निर्माता म्हणून निखिल काम बघत होता. एक कलाकार आणि निर्माता म्हणून अनेकदा आमच्या शाब्दिक चकमकी उडाल्या होत्या. त्या गोष्टी आठवल्या तर आमची मैत्रीच काय तर आमचं लग्न झालं यावर कधीकधी माझा विश्वासच बसत नाही.’

शाहरुखनं सहा वर्षांपूर्वीच रणवीरच्या अटकेबद्दल केलं होतं भाकित

श्रेया म्हणाली, ‘एकदा निखिलने निर्मिती केलेल्या प्रोजेक्टला पुरस्कार मिळाला होता आणि मी त्याचे अभिनंदन करण्यासाठी फोन केला. त्या एका फोनने आमच्यातील भांडण आणि मतभेद, गैरसमज दूर झाले. जो काही वाद होता तो मतभिन्नता असल्यामुळे होता हे आम्हाला दोघांनाही कळलं. हे आधी आम्ही लक्षातच घेत नव्हतो. त्यानंतर आम्ही भेटायला लागलो अधिकाधिक जाणून घेतल्यानंतर आमच्या दोघांच्या लक्षात आलं की आम्हाला एकमेकांविषयी काहीतरी खास भावना वाटत आहेत. आणि मग एका पॉईंटवर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.


श्रेया असंही म्हणाली की आम्ही दोघे जेव्हा आमच्या रिलेशनशिपचा विचार करतो तेव्हा आपण कुठल्या कुठल्या विषयावर फालतू भांडण करत होतो हे आठवलं की आम्ही खूप हसतो. निखिलबरोबर भांडत बसण्यापेक्षा त्याला कौतुकाचा मी एक फोन केला नसता तर कदाचित आज आम्ही एकत्र नसतो. त्यामुळे त्या एका फोनमुळे माझं आयुष्य बदलून गेलं आणि निखिलसारखा एक खूप समंजस जोडीदार मला मिळाला ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.

जगात ९९ टक्के लोकांना पहिलं प्रेम मिळतच नाही- रवी जाधव

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.