बर्मिंगहॅम: भारताचा धाकड वेटलिफ्टर लवप्रीत सिंह(Lovepreet Singh)ने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. लवप्रीतने पुरुषांच्या ९१ किलो वजनी गटात शानदार कामगिरी केली. त्याने स्नॅचमध्ये १६३ किलो वजन उचलले तर क्लीन अँन्ड जर्कमध्ये १९२ किलो वजन उचलले. लवप्रीतने एकूण ३५५ किलो वजन उचलत देशाला पदक जिंकून दिले. भारताचे हे १४वे पदक ठरले.

पुरुषांच्या ९१ किलो गटात एक वेळ अशी होती की लवप्रीत अव्वल स्थानी होता. त्यानंतर तो तिसऱ्या क्रमांकावर घसरला. पंजाबच्या अमृतसर येथील लवप्रीतने आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये कांस्य जिंकले होते तर राष्ट्रकुल ज्युनियर स्पर्धेत तो चॅम्पियन राहिला होता.

वाचा- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज: अखेरच्या दोन टी-२० मॅच रद्द होणार? अडचणीत सापडले खेळाडू

पुरुषांच्या ९१ किलो गटात एक वेळ अशी होती की लवप्रीत अव्वल स्थानी होता. त्यानंतर तो तिसऱ्या क्रमांकावर घसरला. पंजाबच्या अमृतसर येथील लवप्रीतने आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये कांस्य जिंकले होते तर राष्ट्रकुल ज्युनियर स्पर्धेत तो चॅम्पियन राहिला होता.

लवप्रीतने त्याचे सर्व ६ अटेम्प्ट उचलले. स्नॅचमध्ये पहिल्या प्रयत्नात त्याने १५७, दुसऱ्या प्रयत्नात १६१ आणि तिसऱ्या प्रयत्नात १६३ किलो वजन उचलले. त्यानंतर क्लीन अँन्ड जर्कमध्ये अनुक्रमे १९६, १८९ आणि १९२ किलो वजन उचलले. तो आघाडीवर होता पण नंतर मागे पडला.

वाचा- राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवसाचे लाइव्ह अपडेट

या वजनी गटात कॅमरूनचा ज्युनिअर पेरिस्लेक्सने एकूण ३६१ किलो वजन उचलले आणि सुवर्णपदक जिंकले. तर समोनच्या जॅक हितिलाने ३५८ किलोसह रौप्य जिंकले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.