बॉलीवूडची अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) केवळ एक सुंदर अभिनेत्रीच नाही तर फॅशनच्या बाबतीत सुद्धा तिचा हात कोणीच पकडू शकत नाही. माधुरी आजच्या अभिनेत्रींच्या युगातली नाही. तिच्या काळातील फॅशन वेगळी होती तेव्हा तर तिच्या फॅशनसमोर सर्वच अभिनेत्री फिक्या पडल्या. आणि आताचा जमाना मलायका, उर्वशी, उर्फी या नव्या व बोल्ड तरूणींचा आहे आणि फॅशनही नवी आहे तरी सुद्धा माधुरीच्या मनमोहक, सालस सौंदर्याला कोणीही मागे सारू शकत नाही.

याचे कारण म्हणजे माधुरी लगेच कोणतीही फॅशन अंगिकारते. आपण आता उतरवायला लागलो आहोत म्हणून तिने सुंदर दिसणे वा नटणे, सजणे सोडलेले नाही. आजही ती मनसोक्त नटते, स्वत:ची पॅम्परिंग करते आणि लोकांना घायाळ करते. मग भलेही ती बॉलिवूडपासून आता चार लांब का असेना..पण तिचा प्रत्येक लुक व्हायरल होतो कारण तो हटकेच असतो. पण नुकताच व्हायरल झालेल्या एक बोल्ड लुकने अनेकांचा कलेजा खल्लास केला. (फोटोज साभार – इंस्टाग्राम @madhuridixitnene)

साडी ड्रेसमध्ये माधुरी

माधुरी दीक्षितने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटोज शेअर केले आहेत ज्यामध्ये तिने मल्टीकलर साडी परिधान केलेली दिसून येत आहे. तिचे हे फोटोज फॅशन स्टायलिस्ट अमी पटेलने सुद्धा शेअर केले आहेत.

(वाचा :- व्हाईट अँड वाईन रेड रंगाच्या बिकिनीत ईशा गुप्ताने फ्लॉंट केली मादक फिगर, मलायका अरोराच्या बोल्डनेसवर फेरलं पाणी)

या डिझायनरच्या कलेक्शनमधून पिक केलेली साडी

माधुरीने हे प्री-ड्रेप्ड आउटफिट फॅशन डिजाईनर अमित अग्रवालच्या कलेक्शनमधून पिक केले आहे. मुख्य म्हणजे या आउटफिटमध्ये ती कमालीची सुंदर दिसते आहे. माधुरीच्या या आउटफिटचे कलर्स एवढे सुंदर होते की तिला एक रिफ्रेशिंग लुक देत होते.

(वाचा :- निक व प्रियंका चोप्राने रोमॅंटिक होत केलं ग्रॅंड बर्थडे सेलिब्रेशन, प्रियंकाच्या ड्रेसच्या डीप कटवरून हटेना नजर)

डीप व्ही नेकलाईनने लावला हॉटनेसचा तडका

या प्रकारचा ड्रेस तुम्ही कोणत्याही प्रकारच्या पार्टी नाईटसाठी कॅरी करू शकता. यामध्ये फ्रंट बाजूला व्ही नेकलाईन दिली गेली होती आणि पदराला पुढील बाजूस गुंडाळले गेले होते. मल्टीशेडची ही प्री-ड्रेप्ड साडी एखाद्या गाऊन सारखी वाटत होती आणि माधुरीला एक युनिक लुक देत होती. वेस्टलाईनवर हे आउटफिट एकदमच टाईट फिट ठेवले होते, जे माधुरीच्या कर्व्हसना फ्लॉन्ट करण्याचे काम करत होते आणि फ्रंटला यात सेंटरला हलका स्लिट दिला गेला होता.

(वाचा :- ऑफ शोल्डर अन् पायावर स्लिट कट असलेला ब्लॅक बोल्ड ड्रेस घालून श्वेता तिवारीचा कहर, खाऊन टाकला लेकीचाही सेक्सीनेस)

परफेक्ट लुक

आपल्या लुकला कम्प्लिट करण्यासाठी माधुरीने सिल्व्हर स्ट्रॅपी हिल्स परिधान केले होते. कानांमध्ये हूप इयररिंग्स आणि हातांमध्ये पिंक कलरचे चंकी ब्रेसलेट परिधान केले होते. मेकअपसाठी माधुरीने मॉव लिप्स, बीमिंग हाईलाइटर, कोहल्ड आईज, रोजी चीक्स आणि आयशॅडोसोबत केसांना सेंटर पार्टेड करून कर्ल्समध्ये मोकळे सोडले होते. एकंदर माधुरीचा हा लुक अगदीच परफेक्ट वाटत होता आणि तिच्या चाहत्यांना देखील हा लुक खूप जास्त आवडला.

(वाचा :- पॅंट न घालता फक्त शॉर्ट ढगळ्या शर्टमधील मलायका अरोराला बघून चाहते स्तब्ध, टोन्ड लेग्सवर म्हणाले, पॅंट विसरलीस.?)

नेहमी ट्राय करते नवीन लुक्स

माधुरी लुक्समध्ये विविध प्रकारचे प्रयोग करते. ती मागच्या पिढीची अभिनेत्री वगैरे स्वत:ला अजिबात मनात नाही. सध्या जे काही ट्रेंडिंग आहे ते ट्राय करण्यावर तिचा भर असतो. मग ते वेस्टर्न असो की पारंपारिक! मात्र एक गोष्ट माधुरीचा कोणताच चाहता अमान्य करणार नाही की माधुरीला साडी लुक सर्वात जास्त सूट होतो साडीमध्ये माधुरी अगदीच किलर दिसते. मग तिचा साडी लुक मॉडर्न असो की अगदीच मराठमोळा पारंपारिक! साडी लुकमध्ये माधुरीला पाहणे म्हणजे निव्वळ सुख असते. तिच्या या लुक वरून हीच गोष्ट सिद्ध होते.

(वाचा :- पायावर स्लिट कट दिलेला स्कर्ट व फुलपाखराचा जाळीदार टॉप घालून जान्हवी कपूरने केलं वातावरण हॉट, फ्लॉंट केले लेग्स)

माधुरीचा अजून एक साडी लुक

माधुरीचा अजून एक साडी लुक मध्यंतरी जास्त व्हायरल झाला होता. या लुकमध्ये तिने ब्ल्यू कलरची साडी परिधान केली होती आणि ही साडी बनवण्यासाठी सिल्क फॅब्रिकचा वापर केल्याचे सहज ओळखता येत होते. याशिवाय साडी वर प्रिंटसह सीक्वन्सची डिटेलिंग केली होती, जी खूपच जास्त सुंदर वाटत होती. अजून एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे साडीच्या बॉर्डरवर गोल्डन जरीचे काम केले होते, जे साडीचे सौंदर्य अधिक जास्त वाढवत होते. या निळ्या रंगाच्या साडीमध्ये माधुरीचे सौंदर्य खूपच जास्त खुलून दिसत होते. माधुरीने या गोटापट्टी असणाऱ्या साडीसोबत मॅचिंग क्रॉप ब्लाउज परिधान केला होता. ज्यामध्ये डीप यू नेकलाईन तिच्या लुकमध्ये सेक्सीनेस वाढवण्याचे काम करत होती. शिवाय आपला हा लुक कंम्प्लिट करण्यासाठी माधुरीने स्टेटमेंट इयररिंग्स आणि रिंग्स देखील कॅरी केली होती. एकंदर तिचा हा लुक एवढा परफेक्ट होता की साडी लुक कॅरी करावा तर असा असेच म्हणावा लागेल. ज्या ज्या तरुणींना साडी नेसण्याची आवड आहे त्यांनी साडी लुक कॅरी कसा करावा त्याच्या टिप्स घ्याव्यात त्या माधुरीकडूनच!

(वाचा :- छोटा डीपनेक ब्लाउज व चमचमत्या चंदेरी लेहंग्यात श्रद्धा आर्याने केली बोल्डनेसची हद्द पार,फ्लॉंट केली सडपातळ कंबर)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.