पुणे : शिवसेनेचे कोथरूड विधानसभेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी आज शिवसेना म्हणजे ठाकरे गट आणि भाजपची युती व्हावी, अशी उघड इच्छा बोलून दाखवली. सोबत मंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी आणि भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ नाराज असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. मात्र ही नाराजी आम्ही दर्शवू शकत नाही, अशी खंत देखील त्यांनी आजच्या कार्यक्रमात व्यक्त केली आहे. पुन्हा संधी मिळाली तर नक्कीच लढू अशी भावनाही मोकाटे यांनी बोलून दाखवली.

आज चंद्रकांत मोकाटे यांनी दिवाळी पहाट निमित्ताने फराळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी सर्व पक्षीय आजी-माजी आमदार- नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. म्हणून भाजपच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी हजेरी लावली होती. दोघांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

मोकाटे म्हणाले की आमच्या युतीच्या सरकारमध्ये मी पण नाराज होतो, आमच्या वहिनी पण नाराज आहेत. मला पण संधी नाही मिळाली. आमचं मन मोठं आहे, पण आम्ही नाराजी दर्शवू शकत नाही. पुण्याने खूप सोसलं आहे, अजूनही सोसायची तयारी आहे, असं म्हणत मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेना आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी स्वतःसोबत भाजपा आमदार माधुरी मिसाळ यांची सुद्धा खंत व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही घडत आहे, ते सगळे पाहत आहेत. नेमका स्वप्नातला महाराष्ट्र आहे की कशातला आहे हे सांगता येत नाही. उद्या काय घडेल हे कोणी सांगू शकत नाही. म्हणजे उद्या परत हे आणि आम्ही एकत्र असू काय हेही आम्हाला माहिती नाही, असं मोकाटे माधुरी मिसाळ यांच्याकडे हात करत युतीबाबत उद्देशून बोलले आहेत. त्यामुळे भविष्यात असं घडणार आहे आणि आमचा आमच्या पक्षप्रमुखांवर विश्वास आहे. असे म्हणत त्यानी पुन्हा भाजपा आणि शिवसेना युतीची इच्छा वक्त केली.

दरम्यान, मी अजिबात नाराज नाही. पक्ष जो निर्णय घेईल त्या आदेशाचं पालन करणं हे आम्ही गेले ३५ वर्षांपासून करत आहोत. त्यामुळे आम्ही नाराज नाही असे म्हणत मंत्रीपदा बाबत सुरू होणाऱ्या राजकीय चर्चांना तिथेच पूर्णविराम आमदार माधुरी मिसाळ यांनी दिला आहे.

शिवसेना-भाजप युती व्हावी हे आम्हाला नेहमीच वाटतं कारण शिवसेना आमचा जुना मित्र आहे. आता अर्धी शिवसेना तरी आमच्यात आली आहे, अर्धी येतील अशी अपेक्षा आहे. आणि युतीबाबत इच्छा व्यक्त करणे हा सगळ्यांचा अधिकार आहे. त्यांनी इच्छा व्यक्त केली म्हणजे आपली लोकशाही आहे. त्यामुळे इच्छा व्यक्त करणं यात काही चुकीचं नाही. असे भारतीय जनता पार्टीच्या आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या.

दुसरीकडे, मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात पेटलेलं रान पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता आहे. मनोज जारांगे पाटील यांनी दवाखान्यातून उपचार घेतल्यानंतर १९ तारखेला पुणे जिल्ह्यातील दौंड येथे त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वी आज मंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केल्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय लवकर मार्गी लागण्याचे संकेत मिळत आहेत.

मी कृष्णभक्त! जमीर शेख झाले शिवराम आर्य, धीरेंद्र शास्त्रींच्या उपस्थितीत हिंदू धर्माचा स्वीकार

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिवाळी पहाट निमित्त दिवाळी फराळासाठी ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळेस त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी उपसमितीचे अध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील हे काम पाहतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे काही मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे. लवकरच मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागेल, असं सूचक वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

राम-सीता हा फक्त हिंदूंचा वारसा नव्हे, राज ठाकरेंच्या दीपोत्सवात जावेद अख्तर यांचं वक्तव्य
चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या उपसमितीचा अध्यक्ष या नात्याने माझा जो संवाद सगळ्यांसोबत सुरू आहे, आणि जी पूर्वतयारी माझी सुरू आहे. त्यामध्ये एकंदरीत चित्र असं दिसतंय की “महिन्याभरातच आरक्षणाचा विषय हा मार्गी लागेल” असे मोठं आणि सूचक वक्तव्य हे चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. म्हणून महिनाभराच्या अवधीमध्ये सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार, की सरकारने मराठ्यांसाठी दुसरा पर्याय निवडला आहे ? हे पाहणं आता खूप महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील यांची हजेरी, फराळावर ताव मारला

Read Latest Maharashtra Updates And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *