महाविकास आघाडीने जगभरातील शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे:नागपुरात बोलताना देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर पलटवार

महाविकास आघाडीने जगभरातील शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे:नागपुरात बोलताना देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर पलटवार

राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी रविवारी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रभर जोडे मारो आंदोलन करण्यात आले. याचाच भाग म्हणून मुंबईतील हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत मविआच्या प्रमुख नेत्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पायी मोर्चा काढला. त्यावर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पन्नास वर्षे शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेस आणि महाविकास आघाडीने जगभरातील शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे, असा प्रति हल्ला चढवला. गेटवे ऑफ इंडिया येथील शिवपुतळा स्थानी जोडे मारो आंदोलन करण्यासह राज्यभरात देखील मविआकडून आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी उद्धव ठाकरेंनी “शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया करण्याची वेळ आली आहे’ असा घणाघात केला. याच्या प्रत्युत्तरादाखल उपमुख्यमंमत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलेल्या अपमानाबद्दल माफी मागावी, असा हल्ला केला. जवाहरलाल नेहरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराजांबद्दल जे लिहले आहे, त्यासंदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार असताना कमलनाथ यांच्या मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजरने हटवण्याचे पाप काँग्रेसने केले त्याची महाविकास आघाडी माफी मागणार का? त्यावर ठाकरे आणि शरद पवार का मूग गिळून बसले आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून छत्रपतींचा पुतळा हटवण्यात आला, यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. काँग्रेसने इतिहासात शिवाजी महाराजांनी सूरत लुटली असे शिकवले. महाराजांनी सूरत लुटली नव्हती स्वराज्याचा खजिना त्या लोकांवर आक्रमण करुन परत मिळवला होता. महाराज जणू काही सामान्य माणसाची लूट करायला गेले होते, असा चुकीचा इतिहास शिकवणाऱ्यांना उद्धव ठाकरे तुम्ही माफी मागायला सांगणार आहात की, खुर्चीसाठी मिंधेपण स्वीकारणार आहात? असा सवाल फडणवीस यांनी केला. हे पूर्ण राजकीय आंदोलन आहे. महाविकास आघाडीने लाल किल्ल्याहून छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेतले असे इंदिरा गांधी यांचे एक तरी भाषण दाखवावे, असे आवाहन फडणवीस यांनी दिले. पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली. त्यानंतरही राजकारण करणे हा त्यांच्या मनाचा कोतेपणा आहे. काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा अपमान केला. त्याबद्दल काँग्रेस आणि महाविकास आघाडीने अगोदर माफी मागितली पाहिजे, असे ते म्हणाले.

​राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी रविवारी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रभर जोडे मारो आंदोलन करण्यात आले. याचाच भाग म्हणून मुंबईतील हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत मविआच्या प्रमुख नेत्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पायी मोर्चा काढला. त्यावर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पन्नास वर्षे शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेस आणि महाविकास आघाडीने जगभरातील शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे, असा प्रति हल्ला चढवला. गेटवे ऑफ इंडिया येथील शिवपुतळा स्थानी जोडे मारो आंदोलन करण्यासह राज्यभरात देखील मविआकडून आंदोलन करण्यात आले. आंदोलनावेळी उद्धव ठाकरेंनी “शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया करण्याची वेळ आली आहे’ असा घणाघात केला. याच्या प्रत्युत्तरादाखल उपमुख्यमंमत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलेल्या अपमानाबद्दल माफी मागावी, असा हल्ला केला. जवाहरलाल नेहरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराजांबद्दल जे लिहले आहे, त्यासंदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार असताना कमलनाथ यांच्या मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजरने हटवण्याचे पाप काँग्रेसने केले त्याची महाविकास आघाडी माफी मागणार का? त्यावर ठाकरे आणि शरद पवार का मूग गिळून बसले आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून छत्रपतींचा पुतळा हटवण्यात आला, यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. काँग्रेसने इतिहासात शिवाजी महाराजांनी सूरत लुटली असे शिकवले. महाराजांनी सूरत लुटली नव्हती स्वराज्याचा खजिना त्या लोकांवर आक्रमण करुन परत मिळवला होता. महाराज जणू काही सामान्य माणसाची लूट करायला गेले होते, असा चुकीचा इतिहास शिकवणाऱ्यांना उद्धव ठाकरे तुम्ही माफी मागायला सांगणार आहात की, खुर्चीसाठी मिंधेपण स्वीकारणार आहात? असा सवाल फडणवीस यांनी केला. हे पूर्ण राजकीय आंदोलन आहे. महाविकास आघाडीने लाल किल्ल्याहून छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेतले असे इंदिरा गांधी यांचे एक तरी भाषण दाखवावे, असे आवाहन फडणवीस यांनी दिले. पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली. त्यानंतरही राजकारण करणे हा त्यांच्या मनाचा कोतेपणा आहे. काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा अपमान केला. त्याबद्दल काँग्रेस आणि महाविकास आघाडीने अगोदर माफी मागितली पाहिजे, असे ते म्हणाले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment