महागाई 4 टक्क्यांहून कमी, ईएमआयही घटण्याची चिन्हे:रेपो दरात पुन्हा घट शक्य, चार देश-विदेशांतील संस्थांचा अंदाज, रस्ते-रेशन, कर्ज मिळण्याचा सुकाळ

देशात महागाई कमी हाेण्याचे संकेत आहेत. फेब्रुवारीत रिटेल महागाई दर जानेवारीच्या तुलनेत कमी हाेऊ शकतात. सर्व श्रेणीतील वस्तू, त्यातही खाद्यपदार्थांचे दर घटल्याने ते ४ टक्के किंवा त्याहून कमी हाेऊ शकतात. ते रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टाच्या आतमध्ये आहेत. तसे झाल्यास आरबीआयची पतधाेरण समिती एप्रिलमध्ये पुन्हा एकदा रेपाे दरात घट करू शकते. जानेवारीत रिटेल महागाई दर ४.३२ टक्के हाेता. सांख्यिकी मंत्रालय फेब्रुवारीची आकडेवारी बुधवारी जाहीर करेल. रिझर्व्ह बँकेने ३१ मार्च राेजी संपणारे आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये रिटेल महागाई दर ४.८ टक्के राहण्याचा अंदाज आहे. केंद्रीय बँकेच्या अंदाजानुसार जानेवारी-मार्च तिमाहीत महागाई दर ४.४ टक्के राहील. फेब्रुवारीची आकडेवारी त्याहून कमी असू शकते. चार संस्थांनी हा अंदाज लावला आहे. माेठा परिणाम : रुपयांतील आधीचे नुकसान भरून निघणार जपानची ब्राेकरेज फर्म नाेमुरा एशियाच्या एका नाेटनुसार भारतात भाजीपाल्याच्या किमतीत घट हाेत आहे. त्यामुळे फेब्रुवारीत किरकाेळ महागाई दर ४ टक्के व जानेवारी -मार्च तिमाहीत ४.१ टक्के राहण्याचा अंदाज आहे. फर्म म्हणाले, पीक उत्पादन वाढणे आणि कारखान्यांतील उत्पादनाचा खर्च स्थिर राहिल्याने रुपयातील घसरण भरून निघेल. माेठा दिलासा : जूनपर्यंत भाजीपाल्याचे दर कमी बँक ऑफ बडाेदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस म्हणाले, तूर्त महागाई दर कमी राहील. प्रत्येक क्षेत्रातील किमती घटू लागल्या आहेत. भाजीपाल्याच्या दरात वेगाने घसरण झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारीत रिटेल महागाई घटून ४.१ टक्क्यांवर येऊ शकते. सर्वाधिक टाेमॅटाे व बटाट्याच्या किमती घटतील. ही स्थिती जूनपर्यंत राहण्याची शक्यता आहे. आशेपेक्षा जास्त : ३.७ टक्क्यांवर येऊ शकताे महागाई दर इंडिया रेटिंग्जमध्ये वरिष्ठ आर्थिक विश्लेषक पारस जसराय म्हणाले, फेब्रुवारीत रिटेल महागाई घटून ३.७ टक्क्यांवर येऊ शकते. हा अंदाज खरा ठरल्यास देशात रिटेल महागाई दर ७ महिन्यांत सर्वात कमी पातळीवर जाईल. जसराय यांच्या म्हणण्यानुसार रिटेलमध्ये खाद्यपदार्थांच्या महागाई दरात घट हाेऊन सुमारे ४ टक्के हाेण्याची शक्यता आहे.