महाराष्ट्र अदानीच्या घशात घालण्याचा शिंदे सरकारचा डाव:लाडकी बहिण योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी सरकारकडे पैसे उरणार नाही- संजय राऊत
![महाराष्ट्र अदानीच्या घशात घालण्याचा शिंदे सरकारचा डाव:लाडकी बहिण योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी सरकारकडे पैसे उरणार नाही- संजय राऊत](https://images.bhaskarassets.com/thumb/1000x1000/web2images/5483/2024/09/29/730-x-548-19_1727586641.jpg)
राज्यातील कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी सरकारकडे पैसे उरणार नाही, भविष्यात पोलिस दलातील लोकांना लाडक्या बहिण योजनेमुळे पगार मिळतील का नाही ही भीती आता व्यक्त होत आहे. निवडणुकीत लाडक्या बहिणीची मते मिळावी यासाठी सर्व निधी त्या योजनेकडे वळवला आहे. त्या योजनेचे श्रेय घेण्यासाठी तिन्ही पक्षात चढाओढ सुरू आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, चांद्यापासून बांद्यापर्यंत असलेला महाराष्ट्र गिळंकृत करण्याचे अदानीचे स्वप्न आहे. त्याची सुरुवात आता होत आहे. विदर्भात अनेक ठिकाणी अदानीचे बोर्ड दिसत आहेत. पंतप्रधान मोदी हे अदानीचे एजंट असल्याप्रमाणे कामे करतात. मात्र, महाराष्ट्रात जोपर्यंत हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते आहेत, तोपर्यंत अदानीचे महाराष्ट्र गिळण्याचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण संजय राऊत म्हणाले की, लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील तिजोरीवर मोठा ताण आला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस सोडा सणासुदीत पगार तरी मिळेल की नाही, याची खात्री नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजना किती महागात पडेल याची उजळणी केली. त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. राज्यात अर्थखाते केवळ नावालाच उरल्याचा आरोप त्यांनी केला. योजनेचा निवडणुकीसाठी वापर संजय राऊत म्हणाले की, तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणताही हप्ता जाणार नाही निवडणुकीसाठी केलेला फंडा आहे असे मी म्हणत नसून नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणतात असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. तर मध्यप्रदेश, गोवा राजस्थान अशा ठिकाणी या लाडक्या बहिणींच्या योजना सुरू होत्या त्या योजना महाराष्ट्रमध्ये आणून फक्त निवडणुकीसाठी त्याचा वापर करण्यात येत आहे. फडणवीसांचे श्रेय घेण्यासाठी बहिणींना पत्र संजय राऊत म्हणाले की, फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव वगळलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील मुख्यमंत्री हा शब्द वगळला आहे. माझ्याकडे पत्र आहे. भाजपनेच ही योजना कशी आणली, आम्हीच कशी आणली हे दाखवण्याचं श्रेय फडणवीस यांनी करत आहे. मोदींच्या संगतीचा चंद्राबाबू यांच्यावरही परिणाम मोदी काळात विकास, आधुनिकता, विज्ञान यापेक्षा अंधश्रद्धा, धर्मांधता याला प्राधान्य मिळत आहे. धर्म ही अफूची गोळी आहे, तर अंधश्रद्धा ही गांजाने भरलेली चिलीम आहे. निवडणुका जिंकण्यासाठी या दोन्हींचा वापर भाजपकडून होतो, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, तिरुपती मंदिरातील प्रसादावरून राजकारण सुरू झाले व त्यात भाजप पुरस्कृत ‘ढोंगीबाबा’ महामंडलेश्वरांनी भाग घेतला. कोणत्याही विषयाचे राजकारण करायचे व शेवटी त्यास धर्माची फोडणी द्यायची, हे तिरुपती मंदिरातील लाडवाच्या प्रसादावरूनही घडले. चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगन रेड्डी यांना बदनाम करण्यासाठी व अडचणीत आणण्यासाठी हे आरोप केले. मोदी यांच्या संगतीचा चंद्राबाबू यांच्यावरही परिणाम झाल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. वाचा सविस्तर