​​​​​​​श्रीगणेशाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज:दिव्य मराठी अ‍ॅपवर 10 खास व्हिडिओ स्टोरीजची मेजवाणी, उद्यापासून अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज

​​​​​​​श्रीगणेशाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज:दिव्य मराठी अ‍ॅपवर 10 खास व्हिडिओ स्टोरीजची मेजवाणी, उद्यापासून अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज

श्रीगणेश अर्थात आपला लाडका बाप्पा उद्या आपल्या भेटीला येत आहे. बाप्पाला विघ्नहर्ता असेही म्हटले जाते. हा विघ्नहर्ता सर्वच प्रकारचे विघ्न दूर करतो. त्यामुळे सर्वजण आपले गाऱ्हाणे त्याच्यापुढे मांडून ते दूर करण्यासाठी त्याला साकडे घालतात. अशा या बाप्पाच्या स्वागताला अवघा महाराष्ट्र सज्ज झाला आहे. दिव्य मराठीनेही यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या वाचकांसाठी विघ्नहर्ता या शिर्षकाखाली 10 खास व्हिडिओ स्टोरीज तयार केल्या आहेत. या स्टोरीज तुम्हाला उद्यापासून म्हणजे श्रीगणेश चतुर्थीपासून दररोज दिव्य मराठी अ‍ॅपवर वाचता येतील. या माध्यमातून आम्ही समाजासाठी खऱ्या अर्थाने विघ्नहर्ता ठरलेल्या विविध सामाजिक संस्था व व्यक्तींच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्यांचे डोंगराएवढे कार्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. चला तर मग उद्या भेटू या मालिकेतील पहिल्या भागात. त्यात आपण पाहुया नकोशा जीवांना आपलंस करणारं घर… गणपती बाप्पा मोरया…

​श्रीगणेश अर्थात आपला लाडका बाप्पा उद्या आपल्या भेटीला येत आहे. बाप्पाला विघ्नहर्ता असेही म्हटले जाते. हा विघ्नहर्ता सर्वच प्रकारचे विघ्न दूर करतो. त्यामुळे सर्वजण आपले गाऱ्हाणे त्याच्यापुढे मांडून ते दूर करण्यासाठी त्याला साकडे घालतात. अशा या बाप्पाच्या स्वागताला अवघा महाराष्ट्र सज्ज झाला आहे. दिव्य मराठीनेही यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या वाचकांसाठी विघ्नहर्ता या शिर्षकाखाली 10 खास व्हिडिओ स्टोरीज तयार केल्या आहेत. या स्टोरीज तुम्हाला उद्यापासून म्हणजे श्रीगणेश चतुर्थीपासून दररोज दिव्य मराठी अ‍ॅपवर वाचता येतील. या माध्यमातून आम्ही समाजासाठी खऱ्या अर्थाने विघ्नहर्ता ठरलेल्या विविध सामाजिक संस्था व व्यक्तींच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्यांचे डोंगराएवढे कार्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. चला तर मग उद्या भेटू या मालिकेतील पहिल्या भागात. त्यात आपण पाहुया नकोशा जीवांना आपलंस करणारं घर… गणपती बाप्पा मोरया…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment