महाराष्ट्राला मिळणार दोन वंदे भारत स्लीपर ट्रेन:नागपूर-मुंबई, नागपूर-पुणे धावणार, ताशी 140 ते 160 किमी असणार वेग

महाराष्ट्राला मिळणार दोन वंदे भारत स्लीपर ट्रेन:नागपूर-मुंबई, नागपूर-पुणे धावणार, ताशी 140 ते 160 किमी असणार वेग

भारतामध्ये वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा मोठ प्रतिसाद मिळत आहे. आता स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसकडे सर्वांचे लक्ष लागले असून लवकरच महाराष्ट्राला दोन वंदे भारत स्लीपर ट्रेन मिळणार आहे. नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते पुणे अशा लांब पल्ल्यासाठी या रेल्वे धावणार आहेत. नागपूर रेल्वेचे डीआरएम विनायक गर्ग यांनी याबाबत माहिती दिली आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रमुख आणि सर्वाधिक मागणी असलेली ट्रेन आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वंदे भारतला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची स्लीपर ट्रेन येणार आहे. नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये 16 कोच असणार आहेत, तर तिचा वेग ताशी 140 ते 160 किमी असेल. या ट्रेनमुळे प्रवाशांना आरमदायी स्लीपर प्रवासाचा आनंद घेता येईल. महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत स्लीपर नागपूर ते मुंबई, पुणे दरम्यान धावणार आहे. या स्लीपर ट्रेनचे भाडे किंवा दरपत्रक अद्याप जाहीर झाले नसून प्रवाशांना त्यासाठी थोडी वाट पहावी लागणार आहे. पहिली वंदे भारत स्लीपर दिल्लीला मिळणार असण्याची माहिती आहे. तर महाराष्ट्रामध्ये वंदे भारत स्लीपरचा मान नागपूरला मिळण्याची शक्यता आहे. नागपूर-पुणे आणि नागपूर-मुंबई यामार्गावर स्लीपर वंदे भारत मिळाली, असा प्रस्ताव नागपूर विभागाने भारतीय रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे, अशी माहिती नागपूरचे डी.आर.एम विनायक गर्ग यांनी दिली. त्यामुळे पुढील काही महिन्यांत नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई दरम्यान स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस धावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या नागपूरातून नागपूर-सिकंदराबाद, नागपूर-इंदूर आणि नागपूर भोपाळ अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment