महाराष्ट्राचा नवा कारभारी कोण?:शिंदे म्हणाले- मुंबईतील बैठकीनंतर नाव निश्चित होईल; भाजपचा मराठा नेत्यांच्या नावावरही विचार सुरू
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवण्यासाठी गुरुवारी रात्री मध्यरात्रीपर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावरही चर्चा झाली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले – बैठक सकारात्मक झाली. आमची अमित शहा व जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाली. ही पहिलीच भेट होती. महायुतीची दुसरी बैठक मुंबईत होईल. त्यात मुख्यमंत्र्याच्या मुद्यावर निर्णय घेतला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे 2 पक्ष निरीक्षक 1 डिसेंबर रोजी मुंबईत येणार आहेत. ते विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहून मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करतील. तूर्त भाजप या पदासाठी मराठा नेत्यांचाही विचार करत आहे.