मुंबई : वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटून गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यात मोठा गदारोळ झाला होता. या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच घेरलं. सरकारच्या निष्क्रियेतेमुळेच राज्यातील लाखो तरुण नोकऱ्यांना मुकले, असा आरोप करण्यात आला होता. हा वाद काहीसा शांत होत असतानाच आता फोन पे या कंपनीनेही आपलं कार्यालय मुंबईतून कर्नाटकमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे.

‘वेदांतानंतर फोन पेची बारी, गब्बर होतायेत शेजारी, महाराष्ट्र पडतोय आजारी, व्वा रे सत्ताधारी,’ असं म्हणत रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच टॅक्समध्ये महाराष्ट्र करतो सर्वाधिक PAY अन् महाराष्ट्राच्या युवांना मात्र बेरोजगारीचा WAY, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांच्या या टीकेला भाजप किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून अद्याप प्रत्युत्तर देण्यात आलेलं नाही.

दरम्यान, वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून टीका झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांनी सरकारची बाजू मांडली होती. विरोधकांकडून राजकारण करण्यासाठी असे आरोप केले जात असून महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असा दावा सरकारकडून करण्यात आला होता. त्यामुळे आता ‘फोन पे’च्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा टीका करण्यात आल्याने सरकारकडून काय उत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.