महाविकास आघाडीची सत्ता आली तर मंत्री होतील:रोहित पवारांच्या मंत्रिपदावरून प्रफुल्ल पटेलांचा शरद पवारांना खोचक टोला

महाविकास आघाडीची सत्ता आली तर मंत्री होतील:रोहित पवारांच्या मंत्रिपदावरून प्रफुल्ल पटेलांचा शरद पवारांना खोचक टोला

अहमदनगर येथील जामखेड तालुक्यातील खर्डा येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शरद पवारांनी संवाद साधला. यावेळी बोलताना रोहित पवार हे मंत्री असतील, असे सूचक वक्तव्य शरद पवारांनी केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तसेच यावर राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी देखील यावर मत व्यक्त केले आहे. भंडारा येथे सध्या अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरू आहे. यावेळी सभेत बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्ही जरी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळे झालो असलो तरी शरद पवार साहेबांबद्दल माझ्या मनात आजही आदर कायम आहे. मी त्यांना आपला गुरु मानतो, आणि त्यानुसारच काम करतो. त्यामुळे, त्यांच्याविषयी माझ्या मनात कोणतीही कटुता नाही. पुढे बोलताना ते म्हणाले, जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता येईल तेव्हाच रोहित पवार मंत्री बनतील, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला आहे. पुढे बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, प्रत्येक नेते हे त्या क्षेत्रात जाऊन आपला नेता निवडून यावा यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करत असतात. परंतु, त्यांची सत्ता येईल, तेव्हाच ते मंत्री करतील. दरम्यान, रोहित पवारांनी पाच वर्षे जनतेची सेवा केली आणि पुढील पाच वर्षे ते महाराष्ट्राची सेवा करतील, त्यांना सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात येईल, असे शरद पवार यांनी म्हणले होते. खासदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले होते. तसेच रोहित पवार आगामी काळात मंत्री बनतील असे विधान शरद पवारांनी केले होते. यावर रोहित पवार म्हणाले, मलाच विशेष वाटते की लोक एवढ्या मोठ्या पदाबाबत माझ्या नावाची चर्चा करतात. हे जनतेचे प्रेम आहे, पण बॅनर लावून काही होत नाही. त्यासाठी खूप कामे करावी लागतात. मी कोणत्याही पदासाठी काम करत नाही, तर महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी काम करतो, असे रोहित पवार म्हणाले.

​अहमदनगर येथील जामखेड तालुक्यातील खर्डा येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शरद पवारांनी संवाद साधला. यावेळी बोलताना रोहित पवार हे मंत्री असतील, असे सूचक वक्तव्य शरद पवारांनी केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तसेच यावर राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी देखील यावर मत व्यक्त केले आहे. भंडारा येथे सध्या अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरू आहे. यावेळी सभेत बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्ही जरी राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळे झालो असलो तरी शरद पवार साहेबांबद्दल माझ्या मनात आजही आदर कायम आहे. मी त्यांना आपला गुरु मानतो, आणि त्यानुसारच काम करतो. त्यामुळे, त्यांच्याविषयी माझ्या मनात कोणतीही कटुता नाही. पुढे बोलताना ते म्हणाले, जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता येईल तेव्हाच रोहित पवार मंत्री बनतील, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला आहे. पुढे बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, प्रत्येक नेते हे त्या क्षेत्रात जाऊन आपला नेता निवडून यावा यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करत असतात. परंतु, त्यांची सत्ता येईल, तेव्हाच ते मंत्री करतील. दरम्यान, रोहित पवारांनी पाच वर्षे जनतेची सेवा केली आणि पुढील पाच वर्षे ते महाराष्ट्राची सेवा करतील, त्यांना सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात येईल, असे शरद पवार यांनी म्हणले होते. खासदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले होते. तसेच रोहित पवार आगामी काळात मंत्री बनतील असे विधान शरद पवारांनी केले होते. यावर रोहित पवार म्हणाले, मलाच विशेष वाटते की लोक एवढ्या मोठ्या पदाबाबत माझ्या नावाची चर्चा करतात. हे जनतेचे प्रेम आहे, पण बॅनर लावून काही होत नाही. त्यासाठी खूप कामे करावी लागतात. मी कोणत्याही पदासाठी काम करत नाही, तर महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी काम करतो, असे रोहित पवार म्हणाले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment