कोल्हापूर: प्रत्येकाच्या घरात जन्माला आलेली मुलगी ही एका दिवशी दुसऱ्या घरची लक्ष्मी बनून जात असते. लहानपणापासून आपले आई-वडील लाडाने प्रेमाने मुलीला मोठं करतात आणि मन जड करत विवाह लावून देतात यानंतरही अनेकांना आपली मुलगी सुखी आहे का आपल्या नंतर तिच्या मागे कोण खंबीरपणे उभे असेल याची सतत काळजी वाटत असते. मात्र, मुलीच्या मागे फक्त आई-वडील आणि परिवारच नाही तर संपूर्ण गावच तिच्या पाठीशी राहिले तर मुलगी गेल्या घरी देखील सुखाने नांदेल या विचाराने कोल्हापुरातील एका गावाने एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

गुटखाबंदी, दारूबंदी, विधवा प्रथा बंदी अशा अनेक निर्णयानंतर गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर गावाने गावातील प्रत्येक मुलीचे ग्रामपंचायतीच्या वतीने कन्यादान करण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नाला सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य उपस्थित राहणार असून कन्यादान म्हणून गावाच्या लेकीला माहेरची साडी देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या माध्यमातून गाव तुझ्या पाठिशी आहे हा संदेश विवाह करुन दुसऱ्या गावी जाणाऱ्या मुलीला या निमित्ताने दिला जाणार आहे.

ऐनापूर गडहिंग्लज तालुक्यातील साधारणत: तीन हजार लोकवस्तीच छोटेसे गाव आहे. मात्र, या गावाने महाराष्ट्र सरकारने गुटखाबंदीचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या गावात त्याची अमंलबजावणी केली. या गावात अनेक वर्षापासून दारूबंदी आहे. विधवा प्रथा बंद करताना प्रत्येक विधवेस ग्रामपंचायतीच्या वतीने मनीमंगळसूत्र देण्यात आले. स्वातंत्र्यदिनी विधवा महिलांना सरपंच आणि उपसरपंच पदाचा मान देतानाच त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विधवा झाल्यानंतर बांगड्या फोडण्याची प्रथाही बंद करण्यात आली.तर आता वर्षाच्या सुरुवातीलाच गावाने आणखी एक आदर्श निर्माण करत गावच्या प्रत्येक मुलीच्या लग्नात ग्रामपंचायतीच्या वतीने कन्यादानाची साडी देण्याचा निर्णय एकमुखी घेतला.

गडचिरोलीचे प्रसिद्ध झाडीपट्टी रंगभूमी कलाकार परशुराम खुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

शिवाय एवढेच नाहीतर लग्नाला सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून चांगली साडी देण्याचे ठरले आहे. सासरी जाताना केवळ माहेरची माणसचं नव्हे तर संपूर्ण गाव पाठिशी असल्याचा संदेश या निमित्ताने देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे येथील सरपंच ईश्वर देसाई यांनी सांगितलं आहे.

झाकीर हुसेन, मुलायमसिंग यादव, सुमन कल्याणपूर, सुधा मूर्ती यांना पद्म पुरस्कार… वाचा संपूर्ण यादी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काळात आज देखील खेडोपाडी पुरोगामी विचारांना जपत अशा नवनवीन पद्धतीचे आणि आदर्शवत निर्णय ग्रामपंचायतीकडून घेण्यात येत असल्याने येथील सरपंचांचे व सदस्यांचे कौतुक होत असून गावातील प्रत्येक मुलीला एक आधार देखील मिळत आहे, असं सोनाली पाटील म्हणाल्या.

नागपूरला शस्त्रासह निघालेल्या व्यक्तीला पुण्यातचं पकडलं, पोलिसांची मोठी कारवाई, वेगळ्या अँगलनं तपास सुरुSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *