पुणे : बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे. नेमकी लोकशाही कुठे चालली आहेय़ या प्रश्नावर माजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, लोकशाही कुठे चालली आहे हा गंभीर विषय आहे. पक्षांतर बंदी कायद्याचे काय चालले आहे. आज मंत्रिमंडळात काय चालले आहे, हे गंभीर प्रश्न आहेत. मात्र आरक्षणाबाबत माझं स्पष्ट म्हणणं आहे की, सरकारने हा प्रश्न सोडवला पाहिजे. माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ पूर्वी धनगर समाजाला कशाच्या आधारावर आश्वासन दिले होते, याचे स्पष्टीकरण दिलं पाहिजे. इतर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वेळ मागितला आहे. इतर आरक्षणा प्रश्नी त्यांनी शपथपूर्वक आश्वासन दिले असेल तर त्याचा आदर करून वेळ दिला पाहिजे, असे चव्हाण म्हणाले..

एकीकडे मराठा आरक्षण तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणावरून समाजात तीव्र भावना आहेत याबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, यावर मी भाष्य करणार नाही. मात्र आपल्या राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडता कामा नये. जे कोणी राजकीय पुढारी सामाजिक स्वास्थ बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते निंदनीय आहे. आपण खेळीमेळीने गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे.. हे प्रश्न कायदेशीर मार्गाने सोडवले पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते. मात्र सरकार गेल्यामुळे ते टिकवता आले नाही. माझी खात्री आहे की, आमचं सरकार असतं तर आरक्षण टिकवलं असतं. मात्र सरकारला अधिकार नसताना देवेंद्र फडणवीस यांनी कायदा करून महाराष्ट्राच्या डोळ्यात धुळ फेकली की काय हा प्रश्न आहे. आज मुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन कोणत्या आधारावर आश्वासन दिलेलं आहे. सामाजिक स्वास्थ कायम राहून हा प्रश्न कसा सोडवणार आहोत यासाठी वेळ दिला पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले…

कुणी अंतिम मुदत दिली म्हणून न्यायव्यवस्था किंवा आयोग काम करत नसतो; राज्य मागासवर्ग आयोगाचा मनोज जरांगेंना टोला
महाविकास आघाडीला मराठा आरक्षण टिकवता आले नाही असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर बोलताना चव्हाण म्हणाले की, यावर फार खोलात जायचं कारण नाही. मराठा आरक्षणासाठी सरकारला वेळ दिला पाहिजे. जेव्हा सरकार सांगेल आम्हाला जमलं नाही तेव्हा नवीन वेळ येईल तेव्हा बघू, असं ते म्हणाले. संभाजीराजे छत्रपतींनी मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनामाची मागणी केली आहे यावर बोलताना चव्हाण म्हणाले की, माझं स्पष्ट मत आहे की समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य होता कामा नयेत. हा प्रश्न रस्त्यावर सुटणारा नाही. रस्त्यावर सोडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर.. महाराष्ट्राच्या दृष्टीने ते दुर्दैवी आहे. कायदेशीर मार्गाने हा प्रश्न सोडविला पाहिजे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
पत्नीच्या माहेरचे श्रीमंत असले तरी जबाबदारी पतीचीच; पुणेकर जोडप्याच्या वादप्रकरणात कोर्टाचा निर्णय

आरक्षणावरून दोन समाजाला खेळवण्याचा कार्यक्रम केला जात आहे. ३ डिसेंबर नंतर राज्याची परिस्थिती भयावह होईल.. या प्रश्नावर बोलताना चव्हाण म्हणाले की, दोन समाजाला भिडवण्याचे काम ज्या कोणी व्यक्तीने केले असेल त्याला जाब विचारावा.. पाच राज्यांच्या निवडणुकीबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, मला खात्री आहे की बहुतेक राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेत येईल.

अतिक्रमणाचा ‘कडेलोट’; सिंहगडावरील पुनर्वसनाला वर्षाने सापडला मुहूर्त, विक्रेत्यांना कुटी मिळणारRead Latest Maharashtra News And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *