माझ्या केसाला जरी धक्का लागला त्यास अजित पवार जबाबदार:मला रोज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत आहेत, लक्ष्मण हाकेंचा पुन्हा हल्लाबोल माझ्या केसाला जरी धक्का लागला त्यास अजित पवार जबाबदार:मला रोज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत आहेत, लक्ष्मण हाकेंचा पुन्हा हल्लाबोल

माझ्या केसाला जरी धक्का लागला त्यास अजित पवार जबाबदार:मला रोज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत आहेत, लक्ष्मण हाकेंचा पुन्हा हल्लाबोल

ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी काही दिवसांपूर्वी टीका केली होती. अजित पवारांनी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याचा गंभीर आरोपही केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी तसेच आमदारांनी हाकेंवर पलटवार केला. आता आज देखील लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. माझ्या केसाला जरी धक्का लागला तर त्यास पवार कुटुंब, अजित पवार आणि रोहित पवार जबाबदार असतील, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. लक्ष्मण हाके यांनी पोस्ट करत अजित पवारांवर टीका केली आहे. ते म्हणाले, मला रोज महाराष्ट्रातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे धमक्या मिळू लागल्या असून मी गावगाड्यातील मेंढपाळाचा पोरगा आहे मी अशा धमक्यांना भीक घालत नाही. मात्र माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी त्यास पवार कुटुंबीय अजित पवार आणि रोहित पवार जबाबदार असतील. पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, अजितदादा तुमच्या पिसाळलेल्या कुत्र्यांना आवर घाला. जर माझ्या केसाला धक्का लागला तर तुम्हाला रस्त्यावर आणू. मी गोरगरीब ओबीसी समाजासाठी आणि त्यांच्या हक्क अधिकारांसाठी लढत असून अर्थ खात्याला गोचीडासारखा चिटकून बसलेला अजित पवार हा ओबीसी समाजाचा निधी देत नसल्याने माझा त्यांच्याशी वाद आहे, असे ते म्हणाले. ओबीसी समाजाचा अडवलेला निधी देण्याऐवजी राष्ट्रवादीचे पदाधिकारी नागपूर पासून पंढरपूर पर्यंत ज्या पद्धतीने धमक्या येऊ लागल्या आहेत ते पाहता माझ्यावर असा हल्ला झाल्यास या संपूर्ण पवार कुटुंब जबाबदार असेल, असा इशारा हाके यांनी दिला आहे.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *