माझ्या नैतिकेनुसार मी दोषी नाही:धनंजय मुंडेंनी पहिल्यांदाच सोडले मौन; राजीनामा देण्याची मागणी देखील फेटाळली

माझी नैतिकता ही माझ्या जनतेसोबत आहे. मात्र, माझ्या नैतिकतेनुसार मी दोषी. मी जर दोषी असेल तर दाखवून द्या, मी राजीनामा देण्यास तयार असल्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मिक कराड सोबत धनंजय मुंडे याचे संबंध आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. राजीनाम्याचा दबाव वाढत असतनाच मुंडे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहे. या दरम्यान त्यांनी केंद्री मंत्री पल्हाद जोशी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रत्रकारांशी संवाद साधला. या प्रकरणात सुरुवातीपासूनच मला टार्गेट केले जात असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. या संदर्भात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा करण्याची माझी देखील मागणी असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.