माझ्याकडे टिप्पर सोडा साधे टायर पण नाही:आमदार सुरेश धसांचे आरोप फेटाळले, पोलिस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

भाजप आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत बीड जिल्ह्यातील विशेषतः परळी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध व्यवाहरांवर भाष्य करत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. यातच त्यांनी भास्कर केंद्रे या पोलिस कॉंस्टेबलचे देखील नाव घेतले होते. भास्कर केंद्रे यांच्या नावार 100 रखेचे टिप्पर असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. यावर आता भास्कर केंद्रे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हेड कॉंस्टेबल भास्कर केंद्रे यांची एक ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. यात ते माझ्याकडे टिप्पर सोडा, साधा टायरही नाही. जर माझ्या कोणत्याही नातेवाईकाकडे, मित्राकडे किंवा इतर कोणाकडे टायर जरी असेल तर मी एका मिनिटात राजीनामा देईन. माझ्यावर कशामुळे हे आरोप होतात हे समजत नाही. तुम्ही कोणालाही माझ्या गावात पाठवा माझ्याबद्दल विचारा. आता मुलीचं लग्न झालं तेव्हा मी कर्ज घेतले होते, असे बोलताना दिसतात. एका वृत्तवाहिनीने त्यांच्या संपर्क केला तेव्हा भास्कर केंद्रे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आले, त्यावर बोलताना भास्कर केंद्रे म्हणाले, मी जे काही बोललोय ते खरे बोललो आहे. सुरेश धस यांनी स्वत:च सांगितले आहे की इथे येऊन चौकशी करा. आता मीही सांगतो की इथे येऊन चौकशी करा. जेसीबी आणि हायवा हे घेण्याइतपत माझी ऐपत नाही. माझ्याकडे काहीही असते तर मी गुपचूप बसलो असतो किंवा फोन बंद केला असता. पुढे बोलताना भास्कर केंद्रे म्हणाले, सुरेश धस हे राष्ट्रवादीत असताना आम्ही काही कारवाई केलेल्या होत्या. त्यामुळे पूर्ववैमन्यसातून ते हे बोलत असावेत. मी आता बाहेर आहे. यानंतर मी याबद्दल कायदेशीर पावले उचलणार आहे. माझ्या कुटुंबाचे, माझ्या मुलीचे फोटोही व्हायरल करण्यात आले. पोलिस खात्यात काम करत असताना माझा रेकॉर्ड तुम्ही पाहा. पोलेस महासंचालकांनी माझा सन्मान केला आहे, असेही भास्कर केंद्रे यांनी म्हंटले आहे. आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
आमदार सुरेश धस यांनी म्हंटले, 15 वर्षांपासून भास्कर केंद्रे हे तिथेच आहेत. त्यांचे स्वत:चे 15 जेसीबी आहेत. 100 राखेचे टिप्पर आहेत. तिथल्या मटक्यावाल्यासोबत त्यांची आर्धी पार्टनरशीप आहे. मीडियाने परळीत जाऊन चेक करावे, असा आरोप केला आहे. मात्र आता भास्कर केंद्रे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.