मुंबई : गेली १८ वर्ष होम मिनिस्टरचे भाऊजी घराघरांत पोहोचलेत. आदेश बांदेकरांची लोकप्रियता तर अफाट आहे. कुठेही गेलं तरी त्यांना तसा अनुभव येत असतोच. त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात ते एका आजींना भेटलेत.

आदेश बांदेकर सध्या अष्टविनायक दर्शन करत आहेत. लेण्याद्री डोंगरावर गिरीजात्मक गणेशाच्या दर्शनाला जात असतानाचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केलाय. त्यात पायऱ्या चढत असताना, एक आजी बाजूला बसलेल्या त्यांना दिसल्या. बांदेकर आजींजवळ थांबले आणि विचारलं खाली जाताय का? त्यावर आजी म्हणाल्या, वर चाललीय दर्शनाला. सोबतीचे पुढे गेले.

Video:अभीसाठी टिफिन घेऊन गेलेल्या अनघाला बसला धक्का, नर्सकडून असं काय कळलं तिला?

यावर भाऊजी म्हणाले, ‘काही काळजी करू नका. मी घेऊन जातो तुम्हाला.’ तसा आजींनी खूश होऊन बांदेकरांना आशीर्वाद दिला आणि म्हणाल्या, प्रत्यक्ष गणपतीच वरून माझ्यासाठी खाली आलाय. आजींचे हे उत्स्फूर्त उद्गार ऐकून सगळेच थक्क झाले. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.


होम मिनिस्टर कार्यक्रमाला नुकतीच १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. तेव्हा भाऊजींबरोबर पडद्यामागच्या कलाकारांबरोबर केक कापला. त्यावेळी बांदेकर म्हणाले, ‘१३ सप्टेंबर २००४ ला हा कार्यक्रम सुरू झाला. १३ दिवसांसाठी सुरू झालेला हा कार्यक्रम इतका मोठा इतिहास घडवेल असं वाटलं नव्हतं. मी भाग्यवान की या आनंदयात्रेच्या पालखीचा भोई होण्याचं भाग्य मला लाभलं. जी जी स्वप्न पाहिली होती, ती सगळी पूर्ण झाली. या कार्यक्रमानं वेगळा आशीर्वाद दिला.’

कंगनासाठी मराठमोळी अभिनेत्री आहे रिअल क्वीन, तिला म्हणाली ‘जिंदाबाद’

आदेश बांदेकर म्हणाले, ‘जगाच्या नकाशावर रोज एका कुटुंबाला बोलतं करणारा आणि इतकी वर्ष चालणारा एकही कार्यक्रम नाही.’ यावेळी त्यांच्या बरोबर पडद्यामागची टीम होती. त्यातले १८ वर्ष स्पाॅट बाॅय म्हणून काम करणारे मिथिलेश यांच्याकडून केक कापला. बांदेकर म्हणाले करोना काळात कार्यक्रम बंद होता, तरीही ही टीम इथेच राहिली. दुसरीकडे गेली नाही.

कोल्हापूरच्या कविता चावलांचं करोडपती होण्याचं स्वप्न २२ वर्षांनी पूर्ण

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.