मुंबई : अभिनेता सुबोध भावे कमालीचा व्यग्र आहे. टीव्ही शो आणि अनेक सिनेमाची शूटिंग्ज, अभिनय, दिग्दर्शन सगळ्या पातळ्यांवर सध्या तो कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी हर हर महादेव सिनेमात सुबोध छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असल्याचं घोषित झालं. त्यावेळी काहींनी कौतुक केलं, तर काहींनी टीकाही केली. अनेकांचं म्हणणं असंही आहे की छत्रपतींच्या भूमिकेत सुबोध योग्य वाटणार नाही.

हर हर महादेव हा सिनेमा मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगु आणि कन्नड भाषेतून प्रदर्शित करण्याचा निर्णय झी स्टुडिओजने घेतलेला आहे. येत्या दिवाळीत पाच भारतीय भाषांमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी सिनेमा ठरणार आहे हे विशेष. नुकतंच सिनेमाचं हिंदी डबिंग पूर्ण झालं. त्याबद्दलच सुबोधनं एक पोस्ट शेअर केली.

गौरी खाननं दिल्या लेक सुहानाला डेटिंग टिप्स, शाहरुखच्या एका सवयीवर मात्र आहे थोडी नाराज!

सुबोधनं लिहिलं आहे, ‘”हर हर महादेव” हिंदी डबिंग संपलं. १२ मार्च २०२० ला “विजेता” प्रदर्शित झाला होता. आणि आता तब्बल अडीच वर्षांनी माझा नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तोही येत्या दिवाळीत. छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत! माझ्यातल्या प्रेक्षकाला ही तितकीच उत्सुकता आहे.’ यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं लिहिलं आहे, ‘आम्हालाही खूप उत्सुकता आहे तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर महाराजांच्या भूमिकेत पाहण्याची आणि ऐकण्याचीही. लोकमान्य टिळकानंतर तुमचा तसाच शहारून टाकणारा बुलंद आवाज पुन्हा एकदा ऐकायला मिळणार.’

आणखी एकानं लिहिलं आहे, ‘विजेतानंतर प्रदर्शित होणाऱ्या हर हर महादेव चित्रपटासाठी आम्ही सर्व प्रेक्षक खूपच उत्सुक आहोत. छत्रपतींच्या भूमिकेत आपणांस पाहण्याची खूप खूप आतुरता तर आहेच. पण तितकाच अभिमान वाटतो आहे. आपणांस व सर्वच सदस्यांस अनेक शुभेच्छा व दिवाळीची प्रतीक्षा.’

या भूमिकेबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला, ‘छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की मनात आपसूकच आदराची आणि अभिमानाची भावना निर्माण होते. केवळ मराठी माणूसच नव्हे तर इतर भाषिकांसाठीही अखंड प्रेरणेचं उर्जास्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा या रयतेच्या राजाची भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे असं मी मानतो.’

डोळ्यांनी धोका दिला, असं का म्हणतेय रिंकू राजगुरू? अभिनेत्रीनं सांगितलं सत्य

दिग्गज कलाकारांसोबत काम करणं हा महत्वाचा होमवर्क | रसिका आगाशेSource link

Leave a Reply

Your email address will not be published.