नाशिक : माजी नगरसेवक प्रवीण उर्फ बंटी तिदमे (Pravin Tidme) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात (Eknath Shinde) प्रवेश केल्यानंतर लागलीच त्यांना महानगर प्रमुख पदाची बक्षिसी मिळाली. मात्र तिदमे नाशिकला परतण्याआधीच त्यांना धक्का बसला आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांनी पत्रक काढून कारवाईची माहिती दिली आहे.

नाशिकमधील सिडको परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे सेनेचे माजी नगरसेवक प्रवीण उर्फ बंटी तिदमे यांनी ठाकरेंची साथ सोडताच पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली. सिडकोच्या गडाला बसलेल्या पहिल्या हादऱ्याचे पडसाद दूरपर्यंत पसरले.

सध्या प्रवीण तिदमे वगळता शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर, रत्नमाला राणे, कल्पना चुंभळे, किरण गामने, सुदाम डेमसे, संगीता जाधव, दीपक दातीर, डी. जी. सूर्यवंशी, सुवर्णा मटाले, श्याम साबळे, चंद्रकांत खाडे आणि दिवंगत कल्पना पांडे असे नगरसेवक आहेत.

हेही वाचा : मुंबईतील प्रकल्पाच्या नोकऱ्यांसाठी चेन्नईला मुलाखत, महाराष्ट्रातील तरुणांच्या आर्थिक खच्चीकरणाचा डाव: आदित्य ठाकरे

रविवारी खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने उद्धव ठाकरेंच्या सेनेतील अनिल ढिकले आणि भाऊलाल तांबडे यांनी मुंबईत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेनेच्या ग्रामीण जिल्हा प्रमुख पदी अनिल ढिकले तर दिंडोरी ग्रामीणच्या जिल्हाप्रमुख पदी भाऊलाल तांबडे यांची नियुक्ती करण्यात आली.

ढिकले यांच्याकडे देवळाली, इगतपुरी आणि सिन्नर, तर तांबडे यांच्याकडे सुरगाणा, कळवळ, दिंडोरी, पेठ आणि निफाड या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोपवली. नाशिक ग्रामीण पूर्व तालुका प्रमुख पदी सुभाष शिंदे यांची तर नाशिक ग्रामीण पश्चिम तालुका प्रमुख पदी महादेवपुरचे सरपंच विलास सांडखोरे यांची नियुक्ती करण्यात आली आणि आता बंटी तिदमे यांची महानगरप्रमुख पदी निवड झाली आहे.

हेही वाचा : शिंदे गटाच्या दाव्याला ठाकरेंकडून टाचणी, 8 राज्यांचे शिवसेनाप्रमुख सेना भवनावरSource link

Leave a Reply

Your email address will not be published.