[ad_1]

ठाणे : बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन कामगारांना रुग्णालयात दाखल केले जात असताना वाटेत एका कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

बाळकुम येथील नारायणी शाळेच्या बाजूला रुणवाल आयरीन या नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या ४० मजली इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना लिफ्टचा दोर तुटल्याने हा अपघात घडला. घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी बाळकुम अग्निशमन दलाला कळवली. तातडीने बाळकुम अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी ओमकार वैती घटनास्थळी टीमसह पोहोचले. तसेच या घटनेची माहिती मिळताच स्थानिक माजी नगरसेवक संजय भोईर यांनी दुर्घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली.

Ajit Pawar: महायुतीत का सामील झालो, अजित पवारांनी कोल्हापूरच्या सभेत सांगितलं कारण…

बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. या दुर्घटनेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी दोन कामगारांना खाजगी रुग्णालयात नेत असताना एका कामगाराचा मृत्यू झाला असून दुसऱ्या कामगाराला फ्रॅक्चर झाले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती निपुण रुग्णालय प्रशासनाने दिली. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *