लोअर परळ परिसरातील कमला मिल टाईम्स टॉवरला भीषण आग:अनधिकृत बांधकामांमुळे अशा घटना घडत असल्याचा मनसेचा आरोप
उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या लोअर परळ परिसरात असलेल्या कमला मिल टाईम्स टॉवरमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीची वातावरण पसरले आहे. सकाळी साडेसहा वाजता टाईम्स टॉवरला आग लागल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. लोअर परळ परिसरातील टाईम्स टॉवर हे कमर्शियल टॉवर असल्यामुळे रात्रीच्या वेळी या ठिकाणी एकही कर्मचारी नव्हता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. आगीची माहिती कळताच अग्निशामक विभागाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आता एकूण सहा दलाच्या माध्यमातून येथील आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. कमर्शिअल कॉम्प्लेक्स असल्यामुळे या इमारतीमध्ये अनेक कंपन्यांचे कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. त्यामुळे या इमारतीला काचेचे टॉवर आहे. त्यामुळे इमारतीच्या बाहेरील बाजूस असलेल्या काचा आणि काही सामान खाली पडताना देखील दिसत आहे. घटनास्थळी मुंबई पोलिस आणि रुग्णवाहिका दाखल झालेले आहेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून आतापर्यंत या आगीत कोणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परिसरात अनेक अनधिकृत बांधकामे असल्याचा मनसेचा आरोप कमला मील परिसरामध्ये अनेक अनधिकृत बांधकामे उभी राहिलेली आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. आग लागण्याची घटना घडल्यानंतर तात्पुरती कारवाई केली जाते. त्यानंतर पुन्हा अशाच घटना समोर येत आहेत. वारंवार या घटना घडू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी देखील मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.