अबू धाबी: संयुक्त अरब अमिरातमध्ये राहणाऱ्या एका भारतीयाचं नशीब चमकलं आहे. एका कंपनीच्या कंट्रोल रूममध्ये ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या श्रीजू हा एका रात्रीत कोट्यधीश झाला आहे. केरळमधील रहिवासी असलेल्या श्रीजूने नुकतीच सॅटर्डे मिलियन्स नावाची लॉटरी जिंकली आहे. त्याला ४५ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. ३९ वर्षीय श्रीजू गेल्या ११ वर्षांपासून फुजैरामध्ये राहतात आणि काम करत आहेत. दुबईपासून फुजैराह ११० किलोमीटर अंतरावर आहे. १५ नोव्हेंबरला सॅटर्डे मिलियन्सची १५४ वी सोडत जाहीर करण्यात आली.
ड्रॉ जिंकल्याची बातमी श्रीजूला मिळाली तेव्हा तो कामावर होता. श्रीजू म्हणाला की, मी केवळ पुरस्कारच नाही तर सर्वोच्च पुरस्कार जिंकला, हे जाणून मला धक्काच बसला. गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, लॉटरी जिंकल्यानंतर श्रीजू म्हणाला, “मी माझ्या कारमध्ये बसणार होतो तेवढ्यात मी माझे महजूज खाते तपासले. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मला पहिले पारितोषिक मिळाले होते. काय करावे तेच कळत नव्हतं. मी खरोखरच ४५ कोटी रुपये जिंकले आहेत याची पुष्टी करण्यासाठी मी फक्त फोन कॉलची वाट पाहत होतो.”

भारतात घर खरेदी करणार
लॉटरीमध्ये जिंकलेल्या पैशातून तो प्रथम भारतात घर खरेदी करणार असल्याचे त्याने सांगितलं. पैशाअभावी तो आजवर घर घेऊ शकला नव्हता. श्रीजूने सांगितल्याप्रमाणे, घर घेण्यासाठी त्यांना कोणाकडूनही कर्ज घ्यावे लागणार नाही.
UAE मध्ये मोठ्या संख्येने भारतीय लॉटरीत पैसे गुंतवतात. त्यात मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यमवर्गीय लोकांची संख्या अधिक आहे. गेल्या काही वर्षांत, अनेक भारतीयांनी लॉटरीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे जिंकले आहेत. श्रीजू व्यतिरिक्त, आणखी एका भारतीयाने गेल्या शनिवारी एमिरेट्स ड्रॉ फास्ट ५ मध्ये राफ्फेल पारितोषिक जिंकले. दुबईत राहणारा केरळचा ३६ वर्षीय सरथ शिवदासन याने सुमारे ११ लाख रुपयांचे बक्षीस जिंकले आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News