लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजाने त्यांना वेगळी ओळख दिली. ज्या आवाजापुढे प्रत्येक गायक नतमस्तक होतो. लता दीदींचे गाणे प्रत्येकाच्या हृदयाला भिडले आहे. लता मंगेशकर एक होत्या आणि नेहमीच एक राहतील. पण गंमत अशी आहे की ज्या काळात प्रत्येक गायिकेला लता दीदींसारखे व्हायचे होते, लतादीदींनी स्वतः एकदा सांगितले होते की, ‘मला पुढच्या आयुष्यात लता मंगेशकर व्हायचे नाही.’ लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत हे सांगितले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. तेव्हा लता मंगेशकर म्हणाल्या होत्या – ‘मला पुढच्या आयुष्यात पुन्हा लता मंगेशकर व्हायचे नाही.’ येत्या २८ सप्टेंबर रोजी लता दीदींची जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही तुम्हाला लता दीदींच्या जुन्या मुलाखतीचा एक किस्सा सांगणार आहोत.

पुन्हा जन्म मिळाला तर…

जावेद अख्तर यांनी घेतलेल्या मुलाखतीत लता मंगेशकर यांनी आपल्या बोलण्यातून त्यांनी भोगलेल्या दुःखांचे आणि वेदनेचे पदर उलगडले. लता दीदींना मुलाखतीच्या शेवटी विचारण्यात आले होते की त्यांना पुढील आयुष्यात काय व्हायचं आहे, त्यावर त्यांचं उत्तर होतं की त्यांना जर पुन्हा जन्म मिळाला तर काहीही व्हायला आवडेल पण फक्त लता मंगेशकर म्हणून पुन्हा जन्माला यायचं नाहीए. लता दीदी यावेळी म्हणाल्या की, लता मंगेशकर होण्याचं जे नुकसान आहे ते फक्त मलाच माहीत त्यामुळेच पुन्हा लता होऊन जन्माला यायचं नाही.

जावेद अख्तर यांनी घेतलेली मुलाखत

जावेद अख्तर म्हणाले होते, ‘लता दीदींनी आयुष्यात कोणती दुःख पाहिली नाही असं झालं नाही. त्या संघर्षमय जीवन जगल्या. बालपणी दु:खाचा डोंगर सोसावा लागला. वडील दीनानाथ हे उत्तम संगीतकार तर होतेच पण ते थिएटरमध्ये अभिनयही करायचे. त्यांनी तीन मराठी चित्रपट केले पण ते फ्लॉप ठरले. त्यामुळे कंपनी बंद करावी लागली. आर्थिक संकटामुळे मंगेशकर कुटुंब १९४१ मध्ये घर विकून पुण्यात आले. दीनानाथ मंगेशकर यांचे १९४३ मध्ये निधन झाले. तेव्हा दीदी १४ वर्षांच्या होत्या. पाच भावंडांमध्ये थोरल्या असल्याने लहान वयातच कुटुंबाचा भार त्यांच्यावर पडला. वयाच्या आठ-दहाव्या वर्षी या मुलीने रंगमंचावर गायला सुरुवात केली. या उत्पनातून त्यांनी कुटुंब चालवले.

मुलीचं गाणं ऐकून पंडित दिनानाथ यांना झालेला अत्यानंद

जावेद पुढे म्हणाले, ‘दीनानाथ मंगेशकर घरी संगीत शिकवायचे. एके दिवशी ते आपल्या एका शिष्याला शिकवत होते. तेवढ्यात वडील काही कामासाठी खोलीतून बाहेर गेले. त्यावेळी लता दीदी संगीताचे धडे घेत नव्हत्या. पण संगीत त्यांच्या घराच्या हवेतच होतं. वडिलांचा शिष्य गाणे नीट गात नसल्याचे लता दीदींच्या लक्षात आले. हे पाहून लता खोलीत शिरल्या आणि त्या मुलाला म्हणाल्या की, वडिलांनी गायले तसे तू गात नाहीस. मग दीदींनी स्वतः ते गाऊन दाखवले. दीदींचं गाण दिनानाथ मागे उभे राहून ऐकत होते. मुलीचा आवाज ऐकून त्यांना अत्यानंद झाला. आपल्या घरातच महान प्रतिभा दडलेली आहे, असे त्यांनी पत्नीला सांगितले.

एका मागोमाग एक दुःख येतच गेले

जावेद अख्तर सांगतात की १९४३ मध्ये लता दीदींनी पहिले हिंदी गाणे गायले होते. शब्द होते – हिंदुस्तान वालों अब तो मुझे पहचानो… खरंच, काही वर्षांतच भारताने आणि संपूर्ण जगाने त्यांना ओळखले. १९४५ मध्ये मंगेशकर कुटुंब पुणे सोडून मुंबईत आले. त्यानंतर लता दीदींनी मास्टर विनायक यांची भेट घेतली आणि त्यांच्या मदतीने मंगेशकर कुटुंबाला नाना चौकात छोटेसे घर मिळाले. दु:ख इथेच थांबले नाही. मास्टर विनायकही जग सोडून गेले. मग संकटं येत राहिली

मजबूर चित्रपटात गाण्याची संधी मिळाली

यानंतर लतादीदींनी मास्टर गुलाम हैदर यांची भेट घेतली. हैदरने त्यांची ओळख त्या काळातील एक मोठे निर्माते मुखर्जी यांच्याशी करून दिली. तेव्हा मुखर्जी शहीद हा चित्रपट बनवत होते. हैदर यांनी दीदींसाठी मुखर्जींकडे शब्द टाकला. दीदींचे गाणे ऐकून मुखर्जी म्हणाले की आवाज खूप पातळ आहे. त्यांनी लता दीदींना नकार दिला. पण गुलाम हैदर यांचा लता दीदींच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास होता. लतादीदींना १९४८ मध्ये आलेल्या मजबूर चित्रपटात गाण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले. १९६० मध्ये दीदींना लंडनच्या अल्बर्ट हॉलमध्ये गाण्याची संधी मिळाली. त्या काळात अल्बर्ट हॉलमध्ये गाण्याची संधी मिळणे ही मोठी गोष्ट मानली जात होती. तेव्हापासून लता दीदींनी कधीच मागे वळून पाहिले नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.