मुंबई : अनेक दशकं रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अलका कुबल आठल्ये यांच्या वाढदिवसाला त्यांच्या सहकलाकारांनी शुभेच्छा दिल्या. त्यानिमित्तानं अभिनेता मिलिंद गवळी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मिलिंद आणि अलका ताईंनी एकत्र खूप काम केलंय. अनेक मराठी सिनेमांत दोघं एकत्र होते.

आपल्या सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये मिलिंद गवळी लिहितात, ‘अलकाताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अलकाताई म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील झाशीची राणी. माहेरची साडी, लेक चालली सासरला यात सोशिक आबला नारीची भूमिका करणारी अलकाताई, प्रत्यक्ष आयुष्यामध्ये दबंग आहे. वाघीण आहेत त्या वाघीण. कोणाच्याही बापाला न घाबरणारी, चांगल्याशी खूपच चांगलं आणि वाईटाशी एकदम वाईट.’

रंग माझा वेगळा : प्रेक्षक ज्याची वाट पाहत होते तो क्षण आला, मालिकेत नवं वळण

अभिनेते पुढे लिहितात, ‘आपल्याला मोठी बहीण असली की कसा तिचा आधार वाटतो आपल्याला, मलाही या रूथलेस फिल्म इंडस्ट्रीमध्ये अलकाताईचा खूप आधार मिळाला आहे. असंख्य सिनेमांमध्ये आम्ही एकत्र काम केलं. समीर आणि त्यांच्या होम प्रोडक्शनमध्ये घरचा माणूस म्हणून त्यांनी मला सतत घेतलं.
या फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप कमी माणसं आपली फॅमिली होतात. अलकाताई माझी फॅमिली आहे. आज अलकाताईंच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद.’

मिलिंद गवळी सोशल मीडियावर नेहमीच मनातल्या बऱ्याच गोष्टी शेअर करत असतात. आततायी अनिरुद्धची भूमिका करणारे अभिनेते मिलिंद गवळी मात्र संवेदनशील व्यक्ती आहेत. त्यांना निसर्गात रमायला आवडतं. नुकताच त्यांनी निसर्गरम्य ठिकाणचा व्हिडिओ पोस्ट केला.

माहेरची साडीसाठी या बॉलिवूड अभिनेत्रीला होती पहिली पसंती, अलका कुबल यांनीच केला खुलासा

मिलिंद गवळी लिहितात, ‘निसर्गाच्या सानिध्यात आपलं मन खूप शांत होतं आणि पाण्याच्या धबधब्याजवळ जर जायला मिळालं तर मनात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. अद्भुत दृश्य डोळ्यांना दिसतं. डोंगरावरून कोसळणार पाणी आणि खडकावर पडल्यानंतर त्याचा सुंदरसा ध्वनी, मन भारावून टाकतं. निसर्गाच्या शक्तीचा सुंदर असा अनुभव मिळतो. आपण पण एक निसर्गाचा छोटासा भाग आहोत याची जाणीव होते.’

लाल किल्ला यतिन कार्येकरांचा आहे असं गाईडनं पर्यटकांना सांगितलं, अमोल कोल्हेंनी सांगितला शुटिंगचा किस्साSource link

Leave a Reply

Your email address will not be published.