मुंबई: राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गटात दसरा मेळाव्यावरुन चढाओढ सुरु होती. शिवाजी पार्क शिंदे गटाला मिळणार की उद्धव ठाकरे गटाला मिळणार असा प्रश्न होता. याप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होती. त्यामध्ये उद्धव ठाकरे गटाची सरशी झाली आहे. शिवसेनेच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीअंती शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर शिवसेनेने एकच जल्लोष केला.

कोर्टाचा निकाल येताच शिवसेना नेते-पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. एकमेकांना पेढे भरवले, फटाके फोडले. मात्र, इतका जल्लोष पाहून भाजप आमदार नितेश राणेंनी शिवसेनेवर पुन्हा एकदा जिव्हारी लागणारी टीका केली आहे.

हेही वाचा –शिवाजी पार्कवर आव्वाज शिवसेनेचाच, ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला हायकोर्टाची परवानगी!

मला वाटलं आदित्यच….

“फक्त मैदानावर सभा घेण्याची परवानगीच मिळाली ना?, मला वाटलं आदित्यच लग्न मुलीशी जमलं म्हणून जल्लोष करत असतील, नाचे कुठले !!”, असं ट्वीट करत नितेश राणेंनी शिवसेना आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी खालच्या पातळीची टीका केली आहे.

पाहा नितेश राणेंचं ट्वीट

हेही वाचा –Dasra Melava : शिवसेनेला शिवाजी पार्क मिळवून देणारे अस्पी चिनॉय कोण आहेत?

कोर्टात काय झालं?

या याचिकेवर शुक्रवारी उच्च न्यायालयात जवळपास साडेतीन तास युक्तिवाद करण्यात आला. शिवसेना, पालिका आणि शिंदे गटाच्या वकिलांकडून आपापली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने पालिकेचा निर्णय योग्य, उचित नाही असा शेरा मारत ठाकरेंना शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला परवानगी दिली आहे. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याची हमी ठाकरेंच्या वकिलांनी न्यायालयात दिली.

हेही वाचा –Dasra Melava: शिंदे गटाने डाव टाकलाच होता, पण एक गेम फसला अन् फासा पलटला, लढाई ठाकरेंनी जिंकली!

मातोश्रीच्या आतल्या आणि बाहेरच्या सगळ्या गोष्टी सांगू, गप्प बस; राणेंचा आदित्य ठाकरेंना इशाराSource link

Leave a Reply

Your email address will not be published.