हॉलीवूड अभिनेता Rober Hoffman ने शोधले

-rober-hoffman-

स्टेप अप २ मधील हॉलीवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमन जेव्हा मुंबईत आला होता तेव्हा म्युझिक व्हिडिओ शूट करताना त्याने धारावीत मलिशाला पाहिले होते. कोविड – १९ दरम्यान जेव्हा त्याला मुंबईत राहावे लागले तेव्हा मलिशाने त्याला आपल्या स्वप्नाबाबत सांगितले आणि सर्व मुलींमध्ये त्याला मलिशा प्रतिभावान आणि वेगळी वाटली होती. तिच्यासाठी फंड रेझिंगही केले.

मलिशामध्ये नैसर्गिक प्रतिभा

मलिशामध्ये नैसर्गिक प्रतिभा

रॉबर्टने खुलासा केला होता की मलिशाला पाहिल्यानंतर त्याला एक वेगळीच चमक जाणवली. झोपडपट्टीच्या बाहेर उभी असणारी मलिशा ही रॉबर्टला इतर लोकांपेक्षा पहिल्याच भेटीत वेगळी वाटली होती. तिला पाहून कोणीच नजर फिरवणार नाही असंही त्याने एका मुलाखतीत सांगितले.

(वाचा – सर्व सौंदर्यवतींना मागे टाकत विजय वर्माची कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये फॅशनच्या बाबतीतही ‘दहाड’)

Slum Princess Of India म्हणून प्रसिद्ध

slum-princess-of-india-

अनेकदा आपल्याजवळ प्रतिभा असूनही नशीब साथ देत नाही, पैसे नसतात. मलिशाच्या डोळ्यातील चमक आणि काहीतरी करण्यासाठी मलिशाची मेहनतच तिला या वयात प्रसिद्धी देत आहे. पाणी, वीज याची कमतरता आणि झोपडपट्टीत वाढणारी मलिशा त्यामुळेच वेगळी ठरली असून ‘Slum Princess Of India’ म्हणून प्रसिद्ध होतेय.

(वाचा – टायडाय ड्रेसमध्ये शिल्पा शेट्टीच्या क्युट समिशाने वेधले सर्वांचे लक्ष, स्माईल पाहून व्हाल फॅन)

कॉन्टेन्ट क्रिएटर

कॉन्टेन्ट क्रिएटर

मलिशा एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून २.५ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. मॉडेलिंग करत मलिशा आपल्या करिअरला सुरूवात केली. तर तिने इन्स्टाग्रामवर कॉन्टेट क्रिएटर म्हणून तिचा प्रवास सुरू झाला होता. आपल्या डायनॅमिक आणि क्रिएटिव्ह शूटसाठी मलिशा प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच ब्युटी ब्रँडसाठी तिची निवड झाल्याचे दिसून आलेत.

(वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे अडकला लग्नबंधनात, स्वप्नवत प्री-वेडिंग शूट तर मराठमोळे लग्न)

मलिशाची स्टाईल

मलिशाची स्टाईल

मलिशा अत्यंत आत्मविश्वासपूर्वक फोटोशूट करते. मलिशा अत्यंत स्टायलिश लुक कॅरी करते. मलिशाने आतापर्यंत अनेक फोटोशूट केले असून तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. अनेक तरूण मुलीही तिला फॉलो करतात.

डोळ्यातील करारी

डोळ्यातील करारी

मलिशाच्या डोळ्यातील आत्मविश्वास दिसून येतो. तिच्या डोळ्यातील स्वप्नं दिसून येतात आणि ती पूर्ण करण्याची तिच्यात धमक आहे हेदेखील कळून येते. इतक्या गोष्टी मिळत असतानाही तिच्यातील निरागसपणा तिने जपून ठेवला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *