मालेगावला आमदार मुफ्ती इस्माईलसमर्थक माजी नगरसेवकावर गोळीबार:दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांकडून गोळीबार, जिवंत काडतूस जप्त
विधानसभेची मतदान व मतमाेजणीप्रक्रिया शांततेत पूर्ण झाली आहे. निकालानंतर काहीउपद्रवी हेतुपुरस्सर शहराचे वातावरण खराबकरण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांकडे यासंदर्भाततक्रारी प्राप्त झाल्या आहेत. प्रशासनाने याची गंभीरदखल घेतली असून कायदा हातात घ्याल तर यादराखा अशी तंबी अपर पोलिस अधीक्षक अनिकेतभारती यांनी राजकीय पक्ष कार्यकर्ते व समर्थकांनादिली आहे. निवडणूक निकाल घाेषित झाल्यानंतरकाही ठिकाणी राजकीय पक्षांच्या समर्थकांमध्येवादावादीचे प्रकार घडत आहे. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समाेरआले आहे. पोलिसांनी हे फुटेजताब्यात घेतले असून परिसरातीलइतर भागातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचेफुटेज तपासले जात आहे.हल्लेखाेरांची ओळख पटविण्याचेकाम सुरु आहे. घटनेचा लवकरचउलगडा हाेईल असे सहायकअधीक्षक संधू यांनी सांगितले. काही नेत्यांची कानउघाडणी मध्य मतदारसंघात चुरशीच्या लढतीत अवघ्या १६२मतांनी विजयावर शिक्कामाेर्तब झाला आहे. निसटतापराभव जिव्हारी लागल्याने पराभूतउमेदवारांच्या समर्थकांमध्ये नाराजीआहे. तर दुसरीकडे अल्प मतांच्याविजयामुळे विजयी उमेदवारांचेसमर्थक जाेमात आहेत. कायदा वसुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाहीयाची काळजी घेऊन समर्थकांना आवर घाला, अशाशब्दात भारती यांनी नेत्यांची कानउघाडणी केली. निकालानंतर वादावादीचे प्रकार विधानसभा निवडणूक निकालघाेषित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मालेगावात गाेळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आमदार मुफ्ती इस्माईल यांचेसमर्थक माजी नगरसेवक नदीमुद्दीन अलीमुद्दीन ऊर्फ नदीम फीटरयांच्यावर दुचाकीवरुन आलेल्यादाेघा अज्ञातांनी गाेळीबार केला.नदीम हे घरात पळाल्याने थाेडक्यात बचावले. हा प्रकार आझादनगर भागातील बागे महेमूद परिसरातरविवारी रात्री पावणेबारा वाजताघडला. दरम्यान, पोलिसांनीघटनास्थळाहून एक जिवंत काडतूसव रिकामी पुंगळी जप्त केली आहे. नदीम फीटर हे रात्री घराबाहेर शेजारच्याशी गप्पा मारत उभे हाेते.थाेड्या वेळानंतर गेटचा दरवाजाउघडून ते दुचाकीजवळ येऊनथांबले. यावेळी दुचाकीवरूनआलेल्या दाेघांपैकी पाठीमागेबसलेल्या व्यक्तीने अचानकत्यांच्यावर गाेळीबार केला. नदीम हेतत्काळ घरात पळाल्याने त्यांनागाेळी लागली नाही. गाेळीबार करूनदाेघेही संशयित फरार झाले. घटनेचीमाहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, सहायक पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू हे घटनास्थळी दाखल झाले. घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी बंदाेबस्तात वाढ केली. पोलिसांनी घटनास्थळाची पहाणीकरत एक रिकामी पुंगळी व एकजिवंत काडतूस हस्तगत केले.गाेळीबार का व कुणी केला याचा पोलिस तपास करत आहे. यामागे राजकीय तसेच आर्थिकदेवाण-घेवाण, बनाव यासह इतरशक्यतांची पोलिसांकडून पडताळणीकेली जात आहे. याप्रकरणीआझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हादाखल झाला आहे.