लाडकी बहीण योजनेचे 2 हजार रुपये देणार:मल्लिकार्जुन खरगे यांनी केली घोषणा, म्हणाले- महाराष्ट्र जिंकला तर संपूर्ण देश जिंकणार
लाडकी बहीण योजनेची चर्चा राज्यभर जोरदार सुरू आहे. तसेच विरोधकांकडूनही या योजनेवर टीकास्त्र डागलं जात आहे. आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही या लाडकी बहीण योजनेवरून मोठी घोषणाच केली आहे. आमचे सरकार निवडून आल्यास लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला 2 हजार रुपये देणार असल्याचे आश्वासन सांगलीत बोलतांना खरगे यांनी दिले. खरी शिवसेना-राष्ट्रवादी आमच्यासोबत-खरगे
खरगे पुढे म्हणाले की, खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादीही आमच्यासोबत आहे. त्यांच्या बाजूने जे आहेत, ते सर्व नकली आहेत. मोदी सरकार केवळ तोडण्याच्या अन् फोडण्याच्याच गोष्टी करते. त्या पलीकडे जाऊन त्यांनी काही केले आहे का? मोदींसमोर तुम्ही तुमचा सन्मान गहाण ठेवणार आहात का? महाराष्ट्र जर जिंकला तर संपूर्ण देश जिंकेल आणि लवकरच भाजपचे सरकार जाणार असा हल्लाबोलही त्यांनी केला. …तर भाजपचं सरकार दिसलं नसतं- खरगे
शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले तर पुतळा पडला. राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा केली तर मंदिर गळायला लागले. गुजरातच्या पुलाचे उद्घाटन केले तर तो पुलही कोसळला. मोदी येत आहेत म्हणून पुतळा लवकरात लवकर बनवण्यात आला आणि घाईघाईत केलेल्या या कामामुळेच हा पुतळा कोसळला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावाले जे काही बनवत आहे, ते सर्वकाही कोसळतंय. शाळेतील अभ्यासक्रमही ते बदलत आहेत. संविधान बदलण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. मात्र आम्हाला जर आणखी 20 जागा मिळाल्या असत्या तर तुम्हाला आज मोदी सरकार दिसले नसते, असा दावाही खरगे यांनी केला. दरम्यान, मल्लिकार्जुन खरगे हे सांगलीत दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी आले होते. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे 1 लाख 70 हजार मतांनी जिंकले आहेत. मात्र, विश्वजित कदम हे एका विधानसभेत 1 लाख 40 हजार मतांनी जिंकले, असे सांगत नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. ही बातमी पण वाचा… चुकीचे काम करतो, तोच माफी मागतो:राहुल गांधींचा PM मोदींच्या माफीनाम्यावर घणाघात; माफी का मागितली? सांगितली 3 कारणे काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी गुरुवारी सकाळी काँग्रेसचे नांदेडचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी सांगली येथे जाऊन काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी आयोजित सभेत राहुल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेल्या माफीवर सडकून टीका केली. चुकीचे काम करतो, तोच माफी मागतो, असे ते म्हणाले. वाचा सविस्तर बातमी…