नवी दिल्ली: करोना इतकं मोठं संकट कधीच जगावर आलं नव्हतं. २०२० मधील ती सर्वात मोठी घटना होती. तेव्हा जगाला कळले की माणसाच्या आरोग्याचा थेट संबंध प्राण्यांशी आहे. परंतु पक्षी आणि सस्तन (Mammals) प्राण्यांवरच संपूर्ण लक्ष देण्यात आलं. पण, उभयचरांकडे (Amphibians) कोणीही लक्ष दिले नाही. जेव्हा की ते माणसाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं योगदान देतात. मानवाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी बेडकांचं अस्तित्व अत्यंत महत्त्वाचं असल्याचं एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. ज्याप्रकारे बेडूक धरतीतलावरुन नामशेष होत आहेत, त्यांच्या प्रजाती नाहिशा होत आहेत, ते माणसांसाठी अत्यंत धोकादायक आहे.

१८९८० मध्येही बेडकांसह इतर अनेक उभयचरांची संख्या कमी

१९८० च्या दशकात, कोस्टा रिका आणि पनामा येथील शास्त्रज्ञांच्या लक्षात आले की बेडकांसह इतर अनेक उभयचरांची संख्या कमी होत आहे. विशेषतः बेडूक आणि सॅलामँडर. ते एका विशिष्ट प्रकारच्या रोगाने मृत होत आहेत. हा रोग एका व्हायरल फंगल पॅथोजेनमुळे (Batrachochytrium dendrobatidis) होत होता आणि हे प्राणी इतक्या वेगाने मृत होत होते की शास्त्रज्ञांना त्यांचा योग्य अभ्यास करण्याची संधीही मिळत नव्हती.

हेही वाचा –सहा जणांवर संशय, पोलिसांनी सापळा रचला; आरोपींकडे सापडलं २२ किलोंचं ‘तरंगतं सोनं’, पोलीस चकित

उभयचरांच्या ५०१ प्रजाती नष्ट

या रोगाने आशिया आणि दक्षिण अमेरिकेत उभयचरांच्या ५०१ प्रजाती नष्ट झाल्या. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जगातील सर्वात नामशेष होणारी आणि होण्याच्या मार्गावर असलेली प्रजाती ही बेडकांचीच आहे. त्यांच्यामुळे हे फंगस जगभरात वेगाने पसरत आहे. तसेच, डास आणि डासांमुळे होणारे रोगही वेगाने पसरत आहेत.

बेडूक आणि सॅलमँडर डासांची संख्या कमी करण्यास मदत करतात. ते त्यांच्या अळ्याही खातात. डास हे बेडूक आणि सॅलमँडर्सचे मुख्य खाद्य आहेत. या जीवांची कुठल्या आजाराने जीव घेतला तर डासांना कोण रोखणार, हा मोठा प्रश्न आहे. डासांची उत्पत्ती थांबली नाही, तर मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या आजारांमुळे माणसांच्या समस्या वाढतच जाणार आहेत. हा अभ्यास दोन वर्षांपूर्वी सादर करण्यात आला होता. पण, आता त्याचे पीअर रिव्ह्यू झाले आहे. हा अभ्यास पर्यावरण संशोधन पत्रांमध्ये प्रकाशित झाला आहे.

हेही वाचा –परभणी हादरवणाऱ्या त्या प्रकरणाचा खुलासा, महिलेला संपवणारा पतीच निघाला, कारण वाचून थक्क व्हाल

जेव्हा बेडकांची संख्या कमी होते, माणसांचं आजारपण वाढतं

व्हायरल फंगल पॅथोजेनमुळे मलेरिया पसरण्याासून रोखणारे बेडूक आणि सॅलामँडर मरत आहेत. कोस्टा रिका मध्ये १९८० आणि १९९० च्या दशकात, त्यानंतर २००० च्या दशकाच्या सुरुवातीस पनामामध्ये या फंगलची वाढ होत होती. १९७६ ते २०१६ पर्यंतचा ग्राफ पाहिला तर जेव्हा जेव्हा बेडकांची संख्या झालीये तेव्हा माणसांच्या आजारपणाचा आलेख वाढला आहे.

हेही वाचा –पाचंही बोटं तुपात, या देशात सापडला सोन्याचा मोठा खजिना, सरकारचा आनंद गगनात मावेना

मलेरियाची प्रकरणे प्रति १००० लोकांमध्ये एका संसर्गावरून दोनपर्यंत वाढली आहेत. साधारणपणे मलेरिया दर हजार लोकांमध्ये १.१ ते १.५ लोकांना होतो. मध्य अमेरिकेत यामुळे मलेरियाच्या रुग्णांमध्ये ७० ते ९० टक्के वाढ झाली आहे.

नामिबियातून ८ चित्ते भारतात दाखल, पंतप्रधान मोदींच्या हस्ते केलं रिलीजSource link

Leave a Reply

Your email address will not be published.