मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाला मंजुरी:309 किमीच्या सर्वात लहान लांबीच्या मार्गासाठी 18 हजार कोटींचा निधी; 2028-29 पर्यंत पूर्ण होणार काम

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाला मंजुरी:309 किमीच्या सर्वात लहान लांबीच्या मार्गासाठी 18 हजार कोटींचा निधी; 2028-29 पर्यंत पूर्ण होणार काम

सर्वात कमी अंतराची रेल्वे सुविधा प्रदान करण्यासाठी मंत्रिमंडळाने 309 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रातील 2 आणि मध्य प्रदेशातील 4 जिल्ह्यांना जोडले जाणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 18, 036 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा नवीन रेल्वे मार्ग मनमाड ते इंदूर असा जोडण्यात येणार आहे. ज्यामुळे इंदूर आणि मुंबई या दोन्ही शहरांना जोडणे शक्य होईल. तसेच, व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहिले तर दोन्ही शहरातील व्यापाराची वृद्धी होण्यासही याचा फायदा होणार असल्यामुळे याचा चांगलाच फायदा होणार आहे. मनमाड-इंदूर हा नवीन रेल्वेमार्ग 2028-29 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यासोबतच या प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान सुमारे 102 लाख मनुष्य-दिवसांचा थेट रोजगारही निर्माण होणार आहे. या प्रकल्पाद्वारे, इंदूर आणि मुंबई या दोन्ही शहरांना जोडण्याव्यतिरिक्त महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील दुर्गम भागातील जिल्ह्यांनाही जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जेणेकरून आजवर ज्या मार्गावर रेल्वे धावलेली नाही, अशा भागांना जोडण्याचा विचार या प्रकल्पांतर्गत केला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने (CCEA) रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत एकूण 18,036 कोटी रुपये (अंदाजे) खर्चाच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. इंदूर आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित नवीन रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल आणि प्रवासाची गतिशीलता सुधारेल तसेच या प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेला वर्धित कार्यक्षमता आणि सेवा विश्वासार्हता प्राप्त होईल. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नवीन भारताच्या दृष्टिकोनाला अनुसरून आखण्यात आला आहे, जो या भागातील लोकांना “आत्मनिर्भर” बनवेल आणि त्या क्षेत्रामध्ये सर्वसमावेशक विकास करेल ज्यामुळे या भागातील लोकांच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील.

​सर्वात कमी अंतराची रेल्वे सुविधा प्रदान करण्यासाठी मंत्रिमंडळाने 309 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रातील 2 आणि मध्य प्रदेशातील 4 जिल्ह्यांना जोडले जाणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 18, 036 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा नवीन रेल्वे मार्ग मनमाड ते इंदूर असा जोडण्यात येणार आहे. ज्यामुळे इंदूर आणि मुंबई या दोन्ही शहरांना जोडणे शक्य होईल. तसेच, व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहिले तर दोन्ही शहरातील व्यापाराची वृद्धी होण्यासही याचा फायदा होणार असल्यामुळे याचा चांगलाच फायदा होणार आहे. मनमाड-इंदूर हा नवीन रेल्वेमार्ग 2028-29 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यासोबतच या प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान सुमारे 102 लाख मनुष्य-दिवसांचा थेट रोजगारही निर्माण होणार आहे. या प्रकल्पाद्वारे, इंदूर आणि मुंबई या दोन्ही शहरांना जोडण्याव्यतिरिक्त महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील दुर्गम भागातील जिल्ह्यांनाही जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जेणेकरून आजवर ज्या मार्गावर रेल्वे धावलेली नाही, अशा भागांना जोडण्याचा विचार या प्रकल्पांतर्गत केला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने (CCEA) रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत एकूण 18,036 कोटी रुपये (अंदाजे) खर्चाच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. इंदूर आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित नवीन रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल आणि प्रवासाची गतिशीलता सुधारेल तसेच या प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेला वर्धित कार्यक्षमता आणि सेवा विश्वासार्हता प्राप्त होईल. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नवीन भारताच्या दृष्टिकोनाला अनुसरून आखण्यात आला आहे, जो या भागातील लोकांना “आत्मनिर्भर” बनवेल आणि त्या क्षेत्रामध्ये सर्वसमावेशक विकास करेल ज्यामुळे या भागातील लोकांच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment