उदयनराजे भोसले म्हणाले की, मनोज जरांगेंना एवढंच सांगितलं की तुमचं कुटुंब आहे. त्यांना तुमची गरज आहे त्यासाठी तुम्ही जगला पाहिजे. माध्यमांच्या लोकांनी विचार करायला हवा की एक व्यक्ती एवढं करु शकतो पण का करु शकतो. कारण त्यांच्यावर अन्याय झाला आहे, असंही ते म्हणाले.
जातनिहाय जनगणना करा जे कुणी असतील त्यांना आरक्षण द्या, असंही उदयनराजे भोसले म्हणाले. मी मराठा म्हणून बोलत नाही पण मनोज जरांगे यांची जी मानसिकता झाली ती सर्वांची झाली आहे. जाती जातीत तेढ कुणी निर्माण केलीय ते तुम्ही शोधा, असंही उदयनराजे भोसले म्हणाले.
प्रश्न सोडवणार नसाल तर माणसांनी कसं जगायचं? प्रत्येकाला कुटुंब असतं, मुलं असतात, त्यांच्या शैक्षणिक प्रवेशाची वेळ येते त्यावेळी आरक्षणाचा प्रश्न येतो. जातनिहाय जनगणना करा आणि ज्यांना द्यायचं आहे त्यांना आरक्षण देऊन टाका, असं उदयनराजे भोसले म्हणाले. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, असंही ते म्हणाले.
उदयनराजे भोसले यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी कानात सांगितलेलं कधी सर्वांना सांगायचं नसतं. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही लढायला सज्ज आहे. आम्ही मराठे आरक्षण मिळवणार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News