पुणे: मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात पेटलेलं रान पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दवाखान्यातून उपचार घेतल्यानंतर १९ तारखेला पुणे जिल्ह्यातील दौंड येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणवरून पुन्हा एकदा राज्यात रान पेटण्याचं चिन्ह पाहायला मिळत आहे. मात्र त्यापूर्वी आज मंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचक वक्तव्य केल्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय लवकर मार्गी लागेल असे दिसत आहे.
संपूर्ण जगाला माहिती माझी जात कोणती, VIRAL दाखल्यावर शरद पवार पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज दिवाळी पहाट निमित्त दिवाळी फराळासाठी ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळेस त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी उपसमितीचे अध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील हे काम पाहतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे काही मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे हे काम सुरू केलेलं आहे. लवकरच मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागेल, असं सूचक वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

मनोज जरांगे पाटलांच्या दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचा विश्वासू माणूस अंतरवाली सराटीत भेटीला

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या उपसमिती या अध्यक्षाच्या नात्याने माझं जो संवाद सगळ्यांसोबत सुरू आहे आणि जी पूर्वतयारी माझी सुरू आहे. त्यामध्ये एकंदरीत चित्र असं दिसतंय की “महिन्याभरातच आरक्षणाचा विषय हा मार्गी लागेल” असं मोठं आणि सूचक वक्तव्य हे चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. म्हणून महिनाभराच्या अवधीमध्ये सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार, की दुसरा पर्याय हा सरकारने मराठ्यांसाठी निवडला आहे? हे पाहणं आता खूप महत्त्वाचा ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *